काबुल विमानतळाजवळ इसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या बॉम्बस्फोटात १७३ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात १३ अमेरिकेचे जवान आणि ३ ब्रिटनचे जवान आहेत. या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने इसिसच्या तळावर एअर स्ट्राईक केला. तसेच या हल्ल्यात विमानतळावर घडवून आणलेल्या आत्मघातकी हल्ल्यामागील मास्टर माईंडला ठार केला असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
आणखी हल्ले होण्याची भीती
अमेरिकेने स्वतः या हल्ल्याची माहिती दिली. विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील नांगरहार या भागात अमेरिकेने हा ड्रोनद्वारे हल्ला केला. आम्ही आमचे लक्ष्य भेदले आहे. या हल्ल्यात एकाही नागरिकाचा मृत्यू झाला नाही, असे अमेरिकेन म्हटले आहे. दरम्यान काबूल विमानतळावर आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. काबूल येथील अमेरिकन दूतावासाने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून अमेरिकन नागरिकांनी ताबडतोब दूर जावे, असे सांगितले आहे. या हल्ल्याची पूर्व कल्पना अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेला होती.
(हेही वाचा : अफगाणिस्तानात तालिबान्यांचे नव्हे इसिसचे राज्य?)
तालिबानऐवजी आता इसिस!
दरम्यान विमानतळावरील बॉम्बस्फोटानंतर तालिबानने हा हल्ला इसिसने केला असल्याचे सांगत ते आमचे विरोधक आहेत, असे म्हटले. त्यावर अमेरिकेने या हल्ल्याचा बदला घेताना इसिसवर हल्ला केला आहे. यावरून आता अमेरिका पुढे तालिबानला सोडून इसिसला लक्ष्य करणार, असे दिसत आहे. ज्या अमेरिकेने तालिबान्यांचा दशतवाद मोडून काढण्यासाठी २० वर्षांपूर्वी तालिबानी राजवट अफगाणिस्तानातून नष्ट केली, मात्र २० वर्षांनंतर अमेरिकेने त्याच तालिबान्यांच्या हातात पुन्हा अफगाणिस्तान सोपवून काय सध्या केले? तालिबान्यांचा दशतवाद पुन्हा सुरूच आहे, त्याला आता अमेरिकासमर्थन देत आहे का? आता तालिबान्यांचा विरोधक इसिसच्या विरोधात कारवाया करत आहे, तेव्हा अमेरिका यापुढे तालिबान्यांचा विरोधक इसिसवर हल्ले करून तालिबान्यांच्या डोक्यावरील भार स्वतःच्या डोक्यावर घेणार का? असे करून अमेरिका तालिबान्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणार का?, असे प्रश्न आता विचारण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community