दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद परिषद होत आहे. (G-20 Summit) त्यासाठी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे भारतात आगमन झाले आहे. भव्य विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
(हेही वाचा – New Delhi : जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द)
जनरल व्ही. के. सिंह हे बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक कारमधून ते पंतप्रधान निवासाकडे रवाना झाले. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रथमच भारतात येत आहेत. बायडन यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडन हे भारतात येतील का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले आहे. (G-20 Summit)
त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे. जो बायडन हे ज्या विमानातून आले आहेत, ते अत्यंत विशेष आहे. हवतून हवेत मारा करु शकणारं शस्त्रसज्य असं हे विमान आहे. राष्ट्राध्यक्षांना संपूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची तयारी या विमानात असल्याचं सांगण्यात येतं आहे.
भारतात 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद पार पडणार आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. जी-20 परिषदेसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. (G-20 Summit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community