शेवगावमध्ये १४ मे रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात जोरदार दगडफेक झाली. यावेळी जाळपोळ देखील करण्यात आली. दोन गटातील वादाचे रुपांतर दंगलीत झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अनेक दुकानांचे नुकसान झाले. दगडफेकीत ३ पोलीस, गृहरक्षक दलाचे ४ जवान जखमी झाले. तसेच इतर नागरिकही जखमी झाले. या दंगलीवरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. शेवगावात झालेल्या दंगलीविषयी भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. विशिष्ट लोकांकडून दंगलीत अल्पवयीन मुलांचा वापर केला जातोय, असं वक्तव्य सुजय विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
(हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ठाकरे गट नाराज; बैठकीत एक आणि बाहेर एक)
नक्की सुजय विखे-पाटील काय म्हणाले?
‘आम्ही या घटनेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करतोय. काही विशिष्ट लोकांनी दंगली सारखे गुन्हे करण्यासाठी नवी पद्धत सुरू केली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं वापरली जात आहेत. जेणेकरून कायदा त्या विषयावर लवचिक आहे. म्हणून ही लवचिकता काढण्यासाठी वय हे महत्त्वाचं नाही, गुन्हा कोणता आहे. त्याला महत्त्व द्यावे, वयाला नाही, अशा पद्धतीची याचिका येत्या महिन्याभरात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आहोत’, असं सुजय विखे-पाटील म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community