Election Result 2022: गोव्यात भाजपच्या बंडखोर पर्रिकरांचे पंख छाटले

115

गोव्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात झाली असून 14 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या 40 जागांवर मतदान झाले. गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून पणजी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव तब्बल 800 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे गोव्यात भाजपच्या बंडखोर पर्रिकरांचे पंख छाटले असल्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशाजनक वातावरण आहे.

लढतीबद्दल समाधानी पण…

उत्पल यांचा पराभव भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. “अपक्ष उमेदवार म्हणून ही एक चांगली लढत होती, मी जनतेचे आभार मानतो. लढतीबद्दल समाधानी आहे, परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे,” दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना म्हणाले.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर! काय आहे कारण?)

म्हणून पर्रिकरांनी केले होते बंड

निवडणूक आयोगाच्या सुरूवातीच्या कलांमध्ये उत्पल पर्रिकर यांनी आघाडी घेतली असून मतमोजणीची प्रक्रिया जशी पुढे सरकत गेली तशी उत्पल पर्रिकर यांची पिछेहाट होऊ लागली. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय झाला. मात्र, बाबूश पुढे भाजपवासी झाले. 2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे, नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी सांगितले होते. मात्र, भाजपने पर्रिकर यांचा इथे पराभव होईल, असे म्हणत इतर दोन जागांचे पर्याय ठेवले होते. त्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी नकार देत बंडाचा झेंडा उभारला होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.