राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) येत्या २२ डिसेंबर रोजी अमरावती शहराच्या विशेष दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा उद्देश प्रामुख्याने महानुभाव पंथाच्या कार्यक्रमासाठी असल्याची माहिती आहे. याच दिवशी डॉ. भागवत (Mohan Bhagwat) संघाच्या स्वयंसेवकांशी विशेष संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात आले. मात्र ही भेटखासगी राहणार असून अजून ठिकाण, स्थान निश्चित झाले नाही. मात्र डॉ. भागवत (Mohan Bhagwat) यांच्या अमरावती दौऱ्याची तयारी सुरू झाल्याचे निश्चितपणे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्रदीपक विजयानंतर डॉ. भागवत (Mohan Bhagwat) यांचा हा पहिलाच अमरावती दौरा असणार आहे. अमरावतीमध्ये भाजपाला (BJP) अभूतपूर्व यश मिळाले आहे.
योगी आदित्यनाथही (CM Yogi Adityanath) येणार ! महानुभाव आश्रमकंवरनगरच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 21, 22 आणि 23 डिसेंबर या तीन दिवसीय कार्यक्रमाच आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक सहभागी होणार आहेत. डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासोबत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तसेच दोन्ही मान्यवरांचा संभाव्य अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता- पासूनच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community