‘तो’ मौलवी निघाला अब्जाधीश! धर्मांतरासाठी शाळकरी हिंदू मुलांना नमाज पढायला सांगायचा! 

धर्मांतर प्रकरणात दोन मौलवींना अटक करताच, या मौलवींच्या विरोधात पोलिसांत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. धर्मांतराने पीडित अशा २० हुन अधिक कुटुंबीयांनी आता एटीएससमोर येऊन जबानी दिली आहे.

उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतलेल्या मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी या दोघांना जबरदस्तीने १ हजार हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली. तेव्हापासून एटीएस चौकशी करत असल्यापासून एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. त्यामध्ये मौलवी गौतम हा अब्जावधी संपत्तीचा मालक असल्याची माहिती मिळताच एटीएसला जबरदस्त धक्का बसला आहे. धर्मांतरासाठी त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय फंडिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे. एटीएसने याची जेव्हा खोलात जाऊन चौकशी सुरु केली, तेव्हा  धर्मांतराच्या नवनवीन पद्धती उघड झाल्या आहेत. या मौलवीने चक्क मूक-बधिर मुलांच्या शाळांवर नियंत्रण मिळवले होते. त्याठिकाणी शिकणाऱ्या हिंदू मुलांना तो जबरदस्तीने नमाज पढायला आणि उर्दू शिकायला सांगायचा, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शाळेच्या शिक्षिकेने केली तक्रार! 

मौलवी महंमद उमर गौतम याच्या विरोधात फतेहपुर येथील शाळेत इंग्रजी शिकवणारी शिक्षिका कल्पना सिंह यांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार मौलवी गौतम याचे शाळेत वारंवार येणे-जाणे असायचे. फेब्रुवारी २०२० मध्ये तो शाळेत आला होता, तेव्हा त्याच्यासोबत २५ अन्य मौलवीही उपस्थित होते. त्यांनी कल्पना यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. ‘तुम्ही आमच्या धर्मात या, तुमचे जीवन सुकर होईल, तुम्हाला अंधश्रद्धेत ठेवले जात आहे. वनात भटकणारा राम देव नाही तर साधा माणूस होता. जर तुम्ही इस्लाम स्वीकारला तर तुम्हाला आर्थिक साहाय्यता करू’, असे तो म्हणाला. याशिवाय तो मौलवी हिंदू विद्यार्थ्यांना मुसलमान विद्यार्थ्यांसोबत नमाज पढायाला सांगायचा, त्यांना जबरदस्तीने उर्दू आणि अरबी शिकवायाला सांगायचा. विरोध केल्यामुळे शिक्षिका कल्पना यांना शाळेतून काढण्यात आल्याचे कल्पना यांनी तक्रारीत म्हटले आहे.

(हेही वाचा : धक्कादायक! ISI च्या पैशावर उत्तर प्रदेशातील १ हजार हिंदूंना बनवले मुसलमान!)

मौलवी मुलांना घरे सोडण्यास भाग पाडायचा! 

धर्मांतर प्रकरणात या दोन मौलवींना अटक करताच, या मौलवींच्या विरोधात पोलिसांत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. यामध्ये पीडित तरुण मनू यादवचे वडील राजीव यादव यांचा समावेश आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांना मौलवी गौतम आणि मौलवी जहांगीर यांनी त्यांचा मुलगा मनू याचे धर्मांतर केले असल्याची समजले तेव्हा त्यांनी तात्काळ त्याला घरी आणले. त्यानंतर मात्र मौलवी गौतम हा राजीव यादव यांना धमक्या देऊ लागला, त्यांच्यावर दबाव आणू लागला. त्यामुळे त्यांनी अखेर त्यांचा मुलगा मनू याला घर सोडून जाण्यास परवानगी दिली. आता मनू बेपत्ता आहे. धर्मांतराने पीडित अशा २० हुन अधिक कुटुंबीयांनी आता एटीएस समोर येऊन जबानी दिली आहे. मे २०१८ पासून दर्श सक्सेना नावाचा मुलगा घर सोडून गेला. त्यांच्याही आईने एटीएसकडे येऊन तक्रार दिली आहे. धर्मांतरानंतर दर्शचा महंमद रेहान अन्सारी बनला आहे, अशी माहिती सामोर आली आहे.

मौलवी गौतमकडे अब्जावधीची मालमत्ता!

मौलवी गौतम हा आणि मौलवी जहांगीर हे मूक-बधिर मुलांच्या शाळांना लक्ष्य करायचे, तसेच गरीब, अबला महिला यांना नोकरी आणि लग्नाची खोटी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करायचे. अशा प्रकारे १ हजार हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले आहे. मौलवी गौतम याच्याकडे अब्जावधीची स्थावर आणि जंगम स्वरूपाची मालमत्ता आहे. एकट्या गाझियाबादमध्ये त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. जिल्ह्यातील शाळांना तो पैसे पुरवायचा. त्यामुळे एटीएस आता अशा शाळांची बँक खाती धुंडाळत आहे.

(हेही वाचा : 75 साली इंदिरा गांधींनी केलेली ‘चूक’ पुन्हा होऊ नये, म्हणून जनता पक्षाने केले ‘असे’ काही ज्यामुळे…)

तपास एनआयएकडे द्या! – हिंदू जनजागृती समिती 

उत्तर प्रदेशातील एक हजार हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या दोन मौलवींना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ या गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा होत असल्याचे चौकशीत पुढे आले, तसेच हे धर्मांतराचे जाळे उत्तर प्रदेशसह दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा आणि केरळ राज्यांतही पसरलेले असल्याचे समोर आले आहे. मागे केरळमधील चार महिलांसह काही पुरुष ‘इसिस’मध्ये सहभागी झाले होते, ते सर्व धर्मांतरीतच होते. एकूणच या देशव्यापी धर्मांतराचा संबंध आतंकवादी कारवाया आणि ‘आय.एस्.आय.’शी असल्याने याचा सखोल तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडून (एन्.आय.ए.कडून) झाला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here