उत्तर प्रदेशात विधानसभेत मंगळवार, ३० जुलै रोजी लव्ह जिहादच्या (Love Jihad) संबंधित विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकात आता आरोपींना जन्मठेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक गुन्ह्यांची शिक्षा दुप्पट करण्यात आली आहे. लव्ह जिहाद (Love Jihad) अंतर्गत अनेक नवीन गुन्ह्यांचीही भर पडली आहे.
लव्ह जिहादशी संबंधित विधेयक मंगळवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकात आता आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, त्यात लव्ह जिहाद (Love Jihad) अंतर्गत अनेक गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे विधेयक योगी सरकारने सोमवारी सभागृहात मांडले.
(हेही वाचा “असे गुन्हे झाले की त्याला फाशीच…”, उरण हत्या प्रकरणानंतर Sharmila Thackeray यांचा संताप)
नवीन विधेयकात काय आहेत तरतुदी?
- नवीन कायद्यात दोषी आढळल्यास 20 वर्षे कारावास किंवा जन्मठेपेची तरतूद.
- आता कोणतीही व्यक्ती धर्मांतराच्या प्रकरणात एफआयआर दाखल करू शकते.
- पहिल्या प्रकरणात, माहिती किंवा तक्रार देण्यासाठी पीडित, पालक किंवा भावंडांची उपस्थिती आवश्यक होती.
- सत्र न्यायालयाखालील कोणतेही न्यायालय लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणांची सुनावणी करणार नाही.
- लव्ह जिहाद (Love Jihad) प्रकरणात सरकारी वकिलाला संधी दिल्याशिवाय जामीन अर्जावर विचार केला जाणार नाही.
- यामध्ये सर्व गुन्हे अजामीनपात्र करण्यात आले आहेत.
पहिला कायदा 2020 मध्ये करण्यात आला
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने लव्ह जिहादविरोधात (Love Jihad) पहिला कायदा 2020 मध्ये केला होता. यानंतर, उत्तर प्रदेश सरकारने विधानसभेत धर्म परिवर्तन बंदी विधेयक 2021 मंजूर केले. या विधेयकात 1 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद होती. केवळ लग्नासाठी केलेले धर्मांतर अवैध मानले जाईल, अशी तरतूद या विधेयकात होती.
Join Our WhatsApp Community