माजी आमदार मुख्तार अन्सारी याला गाझीपूर येथील न्यायालयाने नुकतेच १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला ५ लाखांचा दंडही ठोठावला. मुख्तार अन्सारी आणि भीम सिंग यांना गँगस्टर कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले.
पाच गुन्ह्यांच्या प्रकरणी कारवाई
माजी आमदार मुख्तार अन्सारी याच्या विरोधात १९९६ साली गँगस्टर केस दाखल केली होती. मात्र, निकालाच्या वेळी मुख्तार अन्सारी न्यायालयात हजर नव्हता. अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्तार अन्सारीला गाझीपूर न्यायालयात पाठवण्यात आले नाही. १९९६ मध्ये आजी आमदार मुख्तार अन्सारी याच्यावर गँगस्टर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्तारवर गँगस्टर कायद्यांतर्गत पाच गुन्ह्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. काँग्रेस नेते अजय राय यांचा मोठा भाऊ अवधेश राय यांची हत्या, कॉन्स्टेबल राजेंद्र सिंग यांची हत्या, कॉन्स्टेबल रघुवंश सिंग यांची हत्या, अतिरिक्त एसपीवरील हल्ला आणि गाझीपूरमधील पोलिसांवर हल्ला या पाच प्रकरणांमध्ये मुख्तार याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने तब्बल २६ वर्षांनंतर शिक्षा सुनावली. मुख्तार अन्सारीला कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी एकाच वेळी गुंड कायदा लागू करण्यात आला.
(हेही वाचा शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह)
Join Our WhatsApp Community