एमपीएससीच्या तीन रिक्त सदस्यांची तातडीने भरती करावी ; Ajit Pawar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीएससीच्या तीन रिक्त सदस्यांची तातडीने भरती करावी ; Ajit Pawar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

40
एमपीएससीच्या तीन रिक्त सदस्यांची तातडीने भरती करावी ; Ajit Pawar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एमपीएससीच्या तीन रिक्त सदस्यांची तातडीने भरती करावी ; Ajit Pawar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) तीन रिक्त सदस्यपदांची तातडीने भरती करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ही नियुक्ती झाल्यास आयोगाच्या परीक्षांसंबंधीच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. (Ajit Pawar)

एमपीएससीमार्फत राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय सेवांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, प्राध्यापक यांसारख्या पदांसाठी निवड केली जाते. आयोगात अध्यक्ष आणि पाच सदस्य असे सहा पदे मंजूर आहेत. मात्र, सध्या अध्यक्ष आणि दोन सदस्य कार्यरत असले तरी उर्वरित तीन सदस्यपदे रिक्त आहेत. त्यामुळे आयोगाच्या कामकाजावर परिणाम होत असून परीक्षा आणि मुलाखतींच्या वेळापत्रकांमध्ये विलंब होत आहे. (Ajit Pawar)

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार
राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती मोठी समस्या निर्माण करत आहे. परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर पडल्याने त्यांचे भवितव्य अनिश्चिततेच्या गर्तेत अडकले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांनी सरकारकडे वारंवार यासंदर्भात निवेदने दिली आहेत. या मागण्यांची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. (Ajit Pawar)

राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची
उपमुख्यमंत्र्यांच्या या मागणीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे या विषयावर काय भूमिका राहते आणि ही रिक्त पदे भरली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयोगाची प्रक्रिया गतिमान करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकार यावर लवकर निर्णय घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Ajit Pawar)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.