वाढवण बंदराला तिन्ही मार्गाने जोडणार ; विधानसभेत Ajit Pawar यांची घोषणा

42
वाढवण बंदराला तिन्ही मार्गाने जोडणार ; विधानसभेत Ajit Pawar यांची घोषणा
वाढवण बंदराला तिन्ही मार्गाने जोडणार ; विधानसभेत Ajit Pawar यांची घोषणा

अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (10 मार्च) राज्याचा (Maharashtra Budget 2025) अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. मुंबईमध्ये लवकरच तिसरं विमानतळ तयार होणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar)

हेही वाचा-भारताच्या विजयाचा धर्मांधांना पोटशूळ; Madhya Pradesh मध्ये दुकाने आणि वाहने पेटवली, पेट्रोल बॉम्बही फेकले

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “वाढवण बंदाराजवळ (Vadhan port) मुंबईचे हे तिसरं विमानतळ तयार केले जाणार आहे. या बंदराजवळच मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्टेशन देखील असणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍त आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग 26 टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे 300 दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे.” (Ajit Pawar)

हेही वाचा-Air India च्या विमानाला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

“सन 2030 पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार आहे.” अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.