छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या (vaghankhe) मदतीने स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता. इतिहासातील ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे. शिवरायांची ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे होती. हीच वाघनखे आता राज्य सरकारने महाराष्ट्रात आणली आहेत. वाघनघे बुधवारी अखेर एका विशेष विमानाने लंडनहून मुंबईत पोहोचली. ही वाघनखे सर्वसामान्यांना पाहता यावीत यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
विशेष दालनं उभारण्यात आलं
ही वाघनखे आता मुंबईहून साताऱ्यात आणली जातील. तिथे ती छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात जनतेला पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. यासाठी तिथे एक विशेष दालनही उभारण्यात आले आहे. या वाघनखांच्या स्वागतासाठी 19 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. (vaghankhe)
खर्च किती ?
ही वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारने किती खर्च केला? असा प्रश्न विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघनखांवर एका दिवसाच्या अधिवेशनावर जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा कितीतरी कमी खर्च झाल्याचे स्पष्ट केले. वाघनखे आणण्याचा व परत नेण्यावर जवळपास 14 लाख 8 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. (vaghankhe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community