Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या देशद्रोह्यांसाठी लोकशाहीतील त्रुटी शस्त्र बनले; सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मांडले वास्तव 

141

या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये अमृतपाल हा खासदार म्हणून निवडून आला, जो खलिस्तनचा समर्थक आहे. पंजाबला भारतापासून वेगळे करण्याच्या कटाला त्याचे समर्थन आहे. असाच काश्मिरात रसीद नावाचा खासदार निवडून आला आहे, जो काश्मीर तोडण्याच्या षड्यंत्रात सहभागी आहे. गोव्यातील वेरियातो फर्नांडिस नावाचा कॉँग्रेसचा खासदार निवडून आला आहे, जो म्हणाला होता आमच्यावर संविधान जबरदस्तीने लादले आहे. असे देशद्रोही विचारांचे लोक निवडणुकीत निवडून आले आहेत, आता ते खासदारकीची शपथ घेताना संविधानाची खोटी शपथही घेतील, ही लोकशाहीची थट्टा नव्हे का? उद्या हे खासदार पंजाब भारतापासून वेगळा करा, काश्मीर तोडा, गोवा राज्य वेगळे करा, असे प्रस्ताव मांडतील, लोकशाहीतील तुटी या देशद्रोह्यांसाठी शस्त्र बनले आहेत असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले.

गोवा येथे श्री रामनाथ देवस्थानात सोमवार, २४ जूनपासून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन संत महंतांचा उपस्थितीत करण्यात आले. यानंतर आयोजित प्रथम सत्रात सद्गुरू डॉ. पिंगळे बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर इंदौर येथील श्री स्वामी अखंडानंद जी गुरुकुल आश्रमाचे संस्थापक, महामंडलेश्वर आचार्य स्वामी प्रणवानंद सरस्वती, इंस्टीट्यूट ऑफ एडवांस्ड साइंसेज, अमेरिका येथील डॉ. नीलेश नीलकंठ ओक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर उपस्थित होते.

(हेही वाचा देश चालवण्यासाठी सर्वांची संमती आवश्यक, लोकसभा अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात करताना Narendra Modi म्हणाले…)

जिहादी भारतावर आक्रमण आहेत. त्यांना भारताला इस्लामिक स्टेट बनवायचे आहे. या जिहादचा प्रतिवाद करण्यासाठी हिंदूंनी सजग बनले पाहिजे. यासाठी इस्रायलचे उदाहरण लक्षात घ्यावे, एकटा इस्रायल त्याच्या आजूबाजूच्या इस्लामिक जिहादी देशांना पुरून उरत आहेत. तेथील दहशतवादी संघटनांचा बिमोड केला आहे, तसे धोरण भारताने आत्मसात केले पाहिजे, असे सद्गुरू डॉ. पिंगळे म्हणाले. या निवडणुकीत हिंदू धर्मीयांमध्ये दोन गट पडले आहेत, एका गटाला वाटते हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार आले आहे, त्यामुळे ते निर्णय घेतील असे वाटते आणि ते निष्क्रिय बनतात, दुसरा गट आहे तो म्हणतो आपल्याला जे हवे आहे ते होत नाही पण भविष्यात होईल, अशी आशा करतो आणि तो निष्क्रिय बनतो. नव्या सरकारकडून आपल्याला काय काय कामे करू घ्यायची आहेत, याचा विचार हिंदूंनी गंभीरतेने करायला हवा, असे डॉ. पिंगळे म्हणाले. ( Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

खोटे नेरेटिव्ह सेट करतात, पण त्याचा प्रतिवाद आपण करू शकत नाही, म्हणून आम्ही हिंदू इंटलेक्चल फोरम स्थापन केले आहे. त्यामध्ये विविध पातळीवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच मागील अधिवेशनात हिंदू राष्ट्र समन्वय समिती स्थापन करण्यात आली. ही समन्वय समिती एक दुसऱ्यासोबत समन्वय साधत असते. त्याच बरोबर हिंदू मंदिर महासंघाची स्थापना केली आहे, अशा रीतीने आम्ही हिंदू इकोसिस्टिम उभी केली आहे, असेही सद्गुरू डॉ. पिंगळे म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.