Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य नाही; कर्नल आर.एस्.एन्. सिंहांचे प्रतिपादन

109
Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : पॅलेस्टाईनच्या समर्थनानंतर लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य नाही; कर्नल आर.एस्.एन्. सिंहांचे प्रतिपादन

भारतविरोधी ‘इकोसिस्टिम’चा प्रारंभ बहुचर्चित ‘तुकडे तुकडे’ आंदोलनापासून झाला. हे आंदोलन हिंदूंच्या प्रतिक्रियेची चाचणी घेण्यासाठी केले गेले होते. या आंदोलनाला विरोध करणारे किती, तटस्थ किती आणि समर्थन करणारे किती जण आहेत, याची हे आंदोलन एक चाचणी होती. ‘पॅलेस्टाईन’चे समर्थन करणारे ओवैसीसारखे फुटीरतावादी संसदेत निवडून आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात लोकसभेत गुंडगिरी दिसल्यास आश्चर्य वाटायला नको ! (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

मुसलमानांना कुराण आणि राज्यघटना यांमध्ये श्रेष्ठ काय ? किंवा ख्रिस्ती यांना बायबल आणि राज्यघटना यांमध्ये श्रेष्ठ काय आहे, हे विचारले, तर त्यांचे उत्तर काय असेल, हे आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा ‘देश’ म्हणून विचार करतो तेव्हा त्यासाठी निर्माण केलेली राज्यघटना असते; मात्र आपण जेव्हा ‘राष्ट्र’ म्हणून विचार करतो, तेव्हा त्यासाठी लिखित राज्यघटनेची आवश्यकता नसते. राष्ट्र हे चिरंतन असते. राष्ट्राची एक मुख्य विचारधारा असते आणि भारताची मुख्य विचारधारा ही कैलाश पर्वत, समुद्र मंथन अशा संस्कृतीशी जोडली आहे. त्यामुळे हिंदू खेरीज भारत राष्ट्र शक्य नाही आणि भारत राष्ट्राशिवाय हिंदू सुरक्षित नाहीत, असे प्रतिपादन संरक्षण विशेषतज्ञ कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या चौथ्या दिवशी केले. ते ‘राष्ट्रावर प्रहार आणि देशावर अधिकार’ या विषयावर बोलत होते. (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : छत्रपती शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह!; उदय माहूरकरांचे प्रतिपादन)

या प्रसंगी ‘आर्टिफिशियल इंटेलीजंसच्या (AI) च्या संदर्भात कर्नाटक येथील ‘ऋषिहुड विद्यालया’चे प्राध्यापक के. गोपीनाथ म्हणाले, ‘‘ए.आय.मधून जी माहिती मिळते, ती केवळ ‘अंदाज’ असते. अगोदरपासून जी माहिती उपलब्ध असते, तीच माहिती केवळ गोळा करून ‘‘ए.आय.’मध्ये प्रसारित करण्यात येते. ‘ए.आय.’मध्ये अंतर्भूत केलेला मजकूर जर हिंदूविरोधी असेल, तर आपल्याला हिंदूविरोधी उत्तरे मिळतील ! त्यामुळे ‘ए.आय.’सारखे तंत्रज्ञान ही समस्या नसून ते चालवणारे कोण आहेत ? आणि त्यासाठी मजकूर पुरवणारे कोण आहेत ही चिंतेची गोष्ट आहे !’’ (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

‘ट्रान्सजेंडर’चे उदात्तीकरण भारतासाठी धोकादायक! – नीरज अत्री, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

नैसर्गिकरीत्या नपुंसकलिंगी असणे आणि शस्त्रक्रियेच्या आधारे लिंगबदल करणे, यांत भेद आहेत. शस्त्रक्रियेद्वारे लिंगपालट केले, तरी व्यक्तीच्या मनातील भावना पालटता येत नाहीत. त्यामुळे अशा लिंगबदल करणार्‍या व्यक्तींचे जीवन पुढे नरकमय होते; मात्र प्रपोगंडा करून याला ‘आधुनिकता’ असल्याचे दाखवले जात आहे. एकदा लिंगपालट केला, तर पुन्हा शस्त्रक्रिया करून त्याला पुन्हा मूळ रूपात आणता येत नाही. परदेशामध्ये यामुळे शेकडो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. भारतातही युवा पिढीला याचे शिकार बनवले जात आहे. चित्रपटांमध्ये अशी पात्र जाणीवपूर्वक दाखवून त्यांचे उद्दात्तीकरण केले जात आहे. याविषयी समाजामध्ये जागृती करणे आवश्यक आहे. (Vaishwik Hindu Rashtra Mahotsav)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.