Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने दिली पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी; बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पाठिंबा

Vanchit Bahujan Aaghadi : बारामतीमध्ये उमेदवार न देता शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा देणार असल्याचे वंचितने जाहीर केले आहे.

226
Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने दिली पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी; बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पाठिंबा
Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने दिली पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी; बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पाठिंबा

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit bahujan aaghadi) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये एका नावाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेमधून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) यांना वंचितने पुण्यातून उमेदवारी दिली आहे.

पुण्यासोबत बारामतीच्या घोषणेनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. बारामतीमध्ये उमेदवार न देता शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा देणार असल्याचे वंचितने जाहीर केले आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: राज्यात मोदी-शाह फुंकणार प्रचाराचे रणशिंग; रामटेकमध्ये मोदींची पहिली सभा)

एमआयएमच्या मतांवर परिणाम ?

यासह नांदेडमधून अविनाश बोसिकर, परभणीतून बाबासाहेब उगले, संभाजीनगरमधून (औरंगाबादमधून) अफसर खान, तर शिरूरमधून मंगलदास बागुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने दिली पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी; बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पाठिंबा
Vanchit Bahujan Aaghadi : वंचितने दिली पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी; बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पाठिंबा

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) वेळी वंचित आणि एमआयएम पक्षाची युती होती. दोन्ही पक्ष एकत्र असल्याने सध्याचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना त्याचा फायदा झाला होता. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा उमेदवार जाहीर केलाय. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना या वेळी मुस्लिम समाजाचा उमेदवार जाहीर केला आहे. याचा एमआयएमच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Vanchit Bahujan Aaghadi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.