Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसनंतर आता उबाठाचे ‘वंचित’शी अंतर 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त व्हॉट्सऍप ऑडीओ क्लिपनंतरच्या विधानानंतर काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीला या लोकसभा निवडणुकीसाठी सोबत घेणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे.

286
Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसनंतर आता उबाठाचे 'वंचित'शी अंतर 
Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसनंतर आता उबाठाचे 'वंचित'शी अंतर 
  • सुजित महामुलकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वादग्रस्त व्हॉट्सऍप ऑडीओ क्लिपनंतरच्या विधानानंतर काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीला या लोकसभा निवडणुकीसाठी सोबत घेणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर उबाठा गटानेही वंचितसोबत अंतर ठेवायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. वंचितने आघाडीत प्रत्येकी १२-१२ जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला तो ‘माझ्याकडे आलेलाच नाही’ असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगून हात झटकले. (Vanchit Bahujan Aghadi)

वंचितची उबाठाशी युती

पटोले यांनी एका पत्रकाराशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना वंचितशी युती होणार नसल्याचे सांगितले आणि त्याबाबतचा व्हॉट्सऍप ऑडीओ क्लिपचा संदेश सर्वदूर पसरला. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, वंचित आणि उबाठाची युती असून आमच्याशी काही चर्चा झालेली नाही. (Vanchit Bahujan Aghadi)

दिखावा नको खरं सांगा

यावर संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकले यांनी “काँग्रेसच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय,” असा थेट आरोप केला. “वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेण्याची भूमिका काँग्रेसने आधीच ठरवली असल्याचं दिसून येतं. आम्ही अनेकदा सांगून, पत्र लिहून आमचा एकत्र येण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र आधीपासून काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला वगळण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमच्या एकाही प्रयत्नाला काँग्रेसने आजवर प्रतिसाद दिला नाही. नाना पटोले पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड जे बोलले ती भूमिका आधीपासून ठरलेली आहे. आता केवळ दिखावा करण्यापेक्षा काँग्रेसने महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते सांगून टाकावं,” असेही खडे बोल सुनावले. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – WFI New Home : कुस्ती फेडरेशनचं कार्यालय ब्रिजभूषण शरण यांच्या घरातून हलवलं

ठाकरेंनी हात झटकले

या प्रकारानंतर उबाठा गटानेही वंचितशी चर्चा सुरु असल्याचे सांगत १२-१२ जागांच्या प्रस्तावावर हात वर केले. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा आणि वंचितने लोकसभेच्या (Lok Sabha) १२-१२ जागा लढवाव्या, असा जाहीर प्रस्ताव पत्र लिहून दिला. ठाकरे यांनी मात्र आज “माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नाही,” असे सांगून हात झटकले. (Vanchit Bahujan Aghadi)

वंचितला उबाठाचे तोंडदेखलं आश्वासन

ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपण स्वतः  बैठक घेऊन बोलणी केली आणि जवळपास पूर्ण झाल्याचे सांगत सगळं जागावाटप सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र वंचितशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांनी उबाठा नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सोपवली आणि युती करण्याचा प्रयत्न करू, असं तोंडदेखलं आश्वासन दिले. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.