Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांनाही पाठिंबा देऊ केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती होऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

219
Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत

आघाडीत जागावाटप करताना अनेक मर्यादा येतात. तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीला क्षमतेपेक्षा जास्त जागा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना आधीच चार जागा दिल्या. गरज पडल्यास आणखी पाचवी जागा देण्याचेही ठरले होते. कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपाला मदत होणार नाही, अशी काळजी घेण्याचे ठरले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी नऊ उमेदवार जाहीर केले असतील तर हे महाराष्ट्राचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे दुर्दैव आहे, अशी खंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी (२७ मार्च) व्यक्त केली. (Sanjay Raut)

वंचित बहुजन आघाडीने आज आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही अकोल्यासह चार जागा देण्यास तयार झालोच होतो. जर चर्चा पुढे गेली असती तर पाचवी जागाही कदाचित त्यांना दिली असती. हे आम्ही तीन पक्षांनी ठरवले होते. काहीही झाले तरी प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याचे आम्ही ठरविले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut)

(हेही वाचा – Civil Defense Force: नागरी संरक्षण दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव)

प्रकाश आंबेडकर यांनी नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांनाही पाठिंबा देऊ केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती होऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या संघटनेचा निर्णय घेतला आहे. तरीही त्यांना आमच्याबरोबर घेण्याचे प्रयत्न आम्ही करत राहू. काहीही झाले तरी आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकांना सामोरे जाईल. उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगलीतील जागेविषयी असलेल्या काँग्रेसच्या नाराजीबाबत बोलताना या दोन्ही जागा आमच्या असून आम्ही अनेक वर्षांपासून तिथे उमेदवार देत आहोत. काँग्रेसची नाराजी असले तर आम्ही चर्चेतून त्यावर तोडगा काढू, असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.