वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि काँग्रेसचे ‘विळ्या भोपळ्याचे’ नाते सुधारण्याची चिन्हे नाहीत. आता वंचित आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपण युतीच्या विरोधात आहात का? असा सवाल केला. (Vanchit Bahujan Aghadi)
…तोपर्यंत जागावाटपावर चर्चा नाही
वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टीका केली. जोवर काही तात्विक मुद्यांवर एकमत व्हावे आणि प्रत्येक राजकीय पक्षाची स्पष्टता येत नाही तोपर्यंत जागावाटपावर चर्चा होणार नाही, असे सांगितले. (Vanchit Bahujan Aghadi)
(हेही वाचा – Chandigarh Mayor Election : ही लोकशाहीची हत्या आहे; चंदीगडच्या महापौर निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालय संतप्त)
चव्हाण हे काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी या भूमिकेचे
पुंडकर पुढे म्हणाले, “आम्ही यासाठी एक मसुदा महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) दिला. या मसुद्यावर महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) प्रत्येक घटक पक्षाने अंतर्गत चर्चा करून भूमिका स्पष्ट करावी, असे ठरले. त्यानुसार काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना समितीचे प्रमुख पद दिले. पण चव्हाण हे काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवावी या भूमिकेचे आहेत. अशी प्रमुख पदे यांना दिली तर युती होणार काशी?” असा प्रश्न त्यांनी केला. (Vanchit Bahujan Aghadi)
(हेही वाचा – Government-Private Colleges : तुमच्या शिक्षणासाठी सरकारी कॉलेजची निवड करताय? चिंता वाटतेय? मग हे वाचा)
प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना
पुढे बोलतांना ते म्हणाले, “काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना प्रश्न विचारायला हवा की आपण युतीच्या विरोधात आहात का? जर नाही, तर प्रमुख पदे युतीच्या विरोधकांना दिली, तर युती होणार कशी?” (Vanchit Bahujan Aghadi)
चार दिवस झाले आणि पुन्हा नवा वाद
वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीत सामावेश होऊन जेमतेम चार दिवस झाले आणि पुन्हा वंचितने काँग्रेसवर टीका केल्याने या युतीची कधी माती होईल हे सांगता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community