आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीच वंचितने ही यादी जाहीर केली आहे. यात वंचितने राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.
वंचितकडुन तृतीयपंथी उमेदवार रिंगणात
वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्या 2019 पासून वंचित बहुजन आघाडी सोबत सक्रिय असून काम करत आहेत. (Vanchit Bahujan Aghadi)
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात दिला उमेदवार
तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. नागपूर दक्षिण मध्य या विधानसभा मतदारसंघातून विनय भागणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नागपूर दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विनय भागणे अशी लढत होणार आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने विधानसभा निवडणूक २०२४ साठी घोषित करण्यात आलेले उमेदवार #VBAforIndia pic.twitter.com/z8h85Ir1SN
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) September 21, 2024
वंचितची पहिली यादी (Vanchit Bahujan Aghadi)
रावेर – शमिभा पाटील
शिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम – मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण मध्य – विनय भागणे
साकोली – डॉ. अविनाश नान्हे
नांदेड दक्षिण- फारुख अहमद
लोहा – शिवा नारांगले
औरंगाबाद पूर्व- विकास रावसाहेब दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम कृष्णा माने
हेही पहा-
Join Our WhatsApp Community