Vanchit Bahujan Aghadi : प्रभावहीन वंचित आघाडीने शिवसेना उबाठाचे ३ आणि काँग्रेसचा एक उमेदवार पाडला

310
Vanchit Bahujan Aghadi : प्रभावहीन वंचित आघाडीने शिवसेना उबाठाचे ३ आणि काँग्रेसचा एक उमेदवार पाडला

वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) लोकसभा २०२४ प्रभाव ओसरला असला तरी महाविकास आघाडीचे चार उमेदवार पाडण्यात वंचितची भूमिका महत्वाची होती, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या चारमध्ये तीन उमेदवार शिवसेना उबाठाचे असून काँग्रेसच्या एकाला फटका बसला आहे. २०१९ मध्ये काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांसाह चार उमेदवारांना वंचितने घरचा रस्ता दाखवला होता. यावेळी प्रभाव कमी झाला असतानाही चार झटके महाविकास आघाडीला बसलेच. (Vanchit Bahujan Aghadi)

एक-तृतीयांश मते उबाठाला पुरेशी होती

बुलढाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेना उबाठाचे नरेंद्र खेडेकर यांचा २९,४७९ मतांनी पराभव झाला तर वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांनी ९८,४४१ मते घेतली. वंचितचा उमेदवार नसता तर ती मते किंवा त्यातील एक-तृतीयांश मते मिळाली असती तरी खेडेकर विजयी झाले असते. मात्र, शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांचा विजय झाला. आज जाधव यांचे नाव केंद्रात मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

हातकणंगलेत पुन्हा फटका

अशाच प्रकारे मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याबाबत झाला. कीर्तिकर केवळ ४८ मतांनी पडले तर वंचितचे अशोक परमेश्वर यांनी १० हजारांवर मते घेतली आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा विजय झाला. हातकणंगले या मतदार संघातही शिवसेनेचे धैर्यशील माने १३,४२६ मताधिककयाने निवडून आले तर वंचितचे डी. सी. पाटील यांनी ३२ हजारांवर मते घेत शिवसेना उबाठाचे सत्यजित पाटील यांना विजयापासून दुर ठेवले. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – Powai Lake जल प्रदूषणाच्या विळख्यातून होतेय मुक्त)

काँग्रेसलाही झटका

काँग्रेसच्या अभय पाटील यांनाही वंचितचा (Vanchit Bahujan Aghadi) झटका बसला नाहीतर आज ते लोकसभेत असते. अकोला मतदार संघात भाजपाच्या अनुप धोत्रे यांचा ४०, ६२६ मतांनी विजय झाला तर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना २,७६,७४७ मते मिळाली. (Vanchit Bahujan Aghadi)

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते तर केवळ प्रकाश आंबेडकर यांनी २.७५ लाखाचा टप्पा पार केला तर हिंगोलीचे बी. डी. चव्हाण यांनी १.६० लाखाहून अधिक मते घेतली. (Vanchit Bahujan Aghadi)

२०१९ ची पुनरावृत्ती

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राज्यात ४० मतदार संघात वंचितने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. तर चंद्रपूर, गडचिरोली, हातकणंगले, हिंगोली, नांदेड, परभणी, सोलापूर या मतदार संघांत लाखांच्या वर मते घेतली होती. माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आणि सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे त्याचप्रमाणे गडचिरोलीचे तत्कालीन काँग्रेस उमेदवार नामदेव उसेंडी, हातकणंगले येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव हा केवळ वंचितच्या मतांमुळे झाला होता. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.