Prakash Ambedkar : पवार-ठाकरेंनी मिळून सांगलीची जागा घेतली!; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेनेने दक्षिण आणि उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले होते. मनसेने धारावीत छटा पूजेला विरोध केला होता तसेच आणि बिहारमधील लोकांना मारहाण केली होती, याची आठवण आंबेडकर यांनी करुन दिली.

176
Prakash Ambedkar : पवार-ठाकरेंनी मिळून सांगलीची जागा घेतली!; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे काहीच नव्हते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बुधवारी (१० एप्रिल) अकोला येथे बोलताना केला. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. या चर्चेनंतर लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील, अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली. (Prakash Ambedkar)

महाविकास आघाडीत सांगली लोकसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेसचे येथील इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना त्यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी बुधवारी अकोल्यात जाऊन आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. या भेटीमुळे विशाल पाटील हे वंचितचे उमेदवार म्हणून किंवा वंचितच्या पाठिंब्याने सांगलीच्या आखाड्यात उतरू शकतात. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगलीचा निर्णय विशाल पाटील यांच्यावर सोपवला असल्याचे स्पष्ट केले. (Prakash Ambedkar)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या निर्णयावर भाष्य करताना आंबेडकर यांनी यामुळे मुंबईत राहणाऱ्या बिहार आणि दक्षिणेतील कार्यकर्ते ज्यांना भाजपा जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे सांगितले. मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेनेने दक्षिण आणि उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले होते. मनसेने धारावीत छटा पूजेला विरोध केला होता तसेच आणि बिहारमधील लोकांना मारहाण केली होती, याची आठवण आंबेडकर यांनी करुन दिली. (Prakash Ambedkar)

मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत. कारण निवडणूक सुरू झाल्यानंतर भाजपावाले मनसेचा पाठिंबा घेतील. ते झाले की मुंबईतील गणित बदलणार असून त्यासाठी आम्ही थांबलो होतो. आता उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईमधील उमेदवार जाहीर करू, असेही आंबेडकर म्हणाले. (Prakash Ambedkar)

(हेही वाचा – Lodha फ्रंटफूटवर Deora यांची ‘हॅट्रीक’?)

वंचितच्या नादाला लागू नका

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा आंबेडकर यांनी यावेळी समाचार घेतला. कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत, असा इशारा आंबेडकर यांनी दिला. (Prakash Ambedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.