Vanchit Bahujan Aghadi ची दुसरी उमेदवार यादी जाहीर

89
Vanchit Bahujan Aghadi ची दुसरी उमेदवार यादी जाहीर
  • प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) बुधवारी (०९ ऑक्टोबर) १० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. वंचितच्या या यादीत सर्व मुस्लिम समाजातील उमेदवारांचा समावेश असून पक्षाने बाळापूर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार नतिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने बाळापूरमधून पक्षाचे नेते डॉ. धैर्यवान पुंडकर यांना उमेदवारी दिली होती.

(हेही वाचा – ‘आप’ ला धडा शिकविण्यासाठी Congress दिल्लीत काढणार यात्रा)

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आदिवासी आणि ओबीसी संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २१ सप्टेंबरला वंचितने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या उपस्थितीत नतिकोद्दीन खतीब यांनी बुधवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रवेश करतच खतीब यांच्यासह १० उमेदवारांच्या नावाची घोषणा वंचितने केली.

(हेही वाचा – Gram Sabha न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील वरसई ग्रामपंचायतीच्या सरपंचाची हकालपट्टी)

वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) मलकापूरमधून शहेजाद खान सलीम खान, परभणीतून सय्यद समी सय्यद साहेबजान, औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक, गंगापूरमधून सय्यद गुलाम नबी सय्यद गफूर, कल्याण पश्चिममधून अयाज गुलजार मोलवी, हडपसरमधून ऍड. मोहम्मद अफरोज मुल्ला, माणमधून इम्तियाज जाफर नदाफ, शिरोळमधून आरिफ मोहम्मदअली पटेल आणि सांगली विधानसभा मतदारसंघातून अल्लाउद्दीन हयातचाँद काजी यांना उमेदवारी दिली आहे. या दुसऱ्या यादीमुळे वंचितने जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या आता २१ इतकी झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.