Vanchit Bahujan Aghadi : आम्हाला बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवले; रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल

278
Vanchit Bahujan Aghadi : आम्हाला बैठकीपासून 'वंचित' का ठेवले; रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल
Vanchit Bahujan Aghadi : आम्हाला बैठकीपासून 'वंचित' का ठेवले; रमेश चेन्नीथाला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर सवाल

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला (Ramesh Chennithala) आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीमध्ये लोकसभा जागावाटप, तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. यावर वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

देशात आणि महाराष्ट्रात भाजप आणि आरएसएसला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लवचिक भूमिका घेऊन महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) समझोता केला आहे. सत्ता परिवर्तनासाठी चर्चा पुढे जात असतांना समन्वयाने महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : अयोध्येपाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल – देवेंद्र फडणवीस)

वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना या बैठकीपासून ‘वंचित’ का ठेवलं ?, असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसने २४ आणि उबाठा गटाने २३ जागांची मागणी केल्याची बातमी पसरली असून, ही बाब खरी आहे का? अशीही विचारणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

महाविकास आघाडीला वंचित आघाडीकडून सातत्याने अटी शर्ती देण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता वंचितकडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आहे. या मुद्द्यांमध्ये राज्यातील संवेदनशील मराठा आरक्षणासह 39 मुद्यांचा समावेश आहे. या मसुद्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणावर सुद्धा भाष्य करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, आरक्षण या मुद्द्यांना सुद्धा वंचितकडून हात घालण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक नवीन मुद्दे सुद्धा या मसुद्यामध्ये समावेश करण्यात आले आहेत. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.