‘पवारांसोबतच भांडण शेतातलं नाही, दिशेचं भांडण आहे; पण आमच्यासोबत ते येतील ही अपेक्षा’

110

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Vanchit Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) सतत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) युतीची घोषणा करावी असं म्हणतं होत. अखेर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची (Shivena Thackeray Group) आणि वंचित आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. ‘ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाटत पाहत होती, ते पूर्ण झाल्याचं’, म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीची घोषणा केली आहे. मात्र या युतीबाबत शरद पवारांनी काहीही माहित नसल्याचं सांगून मी या भानगडीत पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असं सांगितलं आहे.

ठाकरे गट आणि वंचित आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘शरद पवारांची युतीबाबतची प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांच भांडणं फार जुन आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्वातला भांडण नाही, दिशेचं भांडण आहे. आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा मी बाळगतो. कारण हा लढा मी एका वेगळ्या मार्गाने बघतोय.’

दरम्यान शिवशक्ती-भीमशक्तीची युती जाहीर करताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती. ते पूर्ण होत आहे. यापूर्वीही हा प्रयत्न झाला होता. आज पुढील वाटचाल एकत्रपणे करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि मी एकाच व्यासपीठावर आलो आहोत.’

(हेही वाचा – ‘मला याबाबत माहित नाही, मी या भानगडीत पडत नाही,’ शरद पवारांचं शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीवर मोठं…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.