देशात सर्वाधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. यामुळे केंद्र सरकारने रेल्वेत बदल करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्याचवेळी सेमीहायस्पीड रेल्वेही आणली गेली आहे. देशातील पहिली सेमी हायस्पीड वंदे भारत (Vande Bharat Express ) चांगलीच लोकप्रिय झाली आहे. मात्र ज्या ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत त्या सर्वांनाच चांगला प्रतिसाद मिळतोय असं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक मार्गांवर या ट्रेन्स अगदी रिकाम्या धावत आहेत.
80 टक्के खुर्च्या रिकाम्याच
नागपूर-सिंकदराबाद (Nagpur-Sindarabad) मार्गावरील वंदे भारत (Vande Bharat Express ) ट्रेनमधील 80 टक्के खुर्च्या रिकाम्याच असतात. प्रावशांची संख्या कमी असल्याने केवळ 20 टक्के क्षमतेनं ही ट्रेन धावते. नागपूर-सिंकदराबाद मार्गावर केवळ 20 टक्के प्रवासी या वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देत असल्याने या ट्रेनचे अनेक डब्बे रिकामेच असतात. 22 ऑगस्ट रोजी सिंकदराबाद ते नागपूर मार्गावर धावलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये एकूण 1440 सीट होत्या. त्यापैकी तब्बल 1200 सीट रिकाम्याच होत्या. याच ट्रेनच्या 2 एक्झिक्युटीव्ह डब्ब्यांमधील 88 सीटपैकी केवळ 10 सीट रिझर्व्ह होत्या. म्हणजेच या डब्ब्यांमधील 78 सीट रिकाम्याच होत्या. (Vande Bharat Express )
डब्यांची संख्या कमी करणार
सिकंदराबाद-नागपूर वंदे भारतला अती-अल्प प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच या मार्गावरील ही ट्रेन बंद केली जाण्याची दाट शक्यता आहे. या मार्गावर 16 सप्टेंबर रोजी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आलेली. मात्र प्राथमिक स्तरावर प्रवाशांची संख्या कमीच असेल तर आधी या ट्रेनच्या डब्यांची संख्या केली जाईल असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या या ट्रेनला एकूण 20 डब्बे आहेत. मात्र असाच कमी प्रतिसाद राहिल्यास ही संख्या 8 पर्यंत कमी केली जाईल असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. असं केल्यास ट्रेनमधील सीटची संख्या 500 ने कमी होईल. (Vande Bharat Express )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community