Vanita Raut : लोकसभा निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार; चंद्रपूरच्या उमेदवाराचं वादग्रस्त आश्वासन

258
Vanita Raut : लोकसभा निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार; चंद्रपूरच्या उमेदवाराचं वादग्रस्त आश्वासन
Vanita Raut : लोकसभा निवडणूक जिंकले, तर प्रत्येक गावात बिअर बार; चंद्रपूरच्या उमेदवाराचं वादग्रस्त आश्वासन

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या प्रचार हा वेगाने सुरू आहे. चंद्रपूरमधील चिमूर गावात रहाणाऱ्या वनिता राऊत (Vanita Raut) या लोकसभा निवडणूक लढवत आहेत. वनिता राऊत यांनी त्यांच्या भागात स्वस्त दरात दारू उपलब्ध करून देण्याचे वादग्रस्त आश्वासन दिले आहे. चंद्रपूरात गेले कित्येक वर्ष दारूबंदी आहे. त्यासाठी त्यांनी रेशनिंग प्रणाली वापरण्याबाबत सांगितले आहे. तसेच, दारू पिणाऱ्यांच्या आणि विक्री करणाऱ्यांच्या परवान्याबाबतही वक्तव्य केलं आहे. त्या निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. (Vanita Raut)

म्हणे, आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर उच्च दारू देईन

दारूबंदीचा फायदा या महिला उमेदवाराने प्रचारासाठी घेतला आहे. वनिता राऊत (Vanita Raut) म्हणाल्या की, “गाव तिथे बिअर बार, पिणाऱ्याकडे आणि विक्री करणाऱ्याकडे परवाना असायला हवा. कायदेशीर मार्गाने दारूविक्री झाली पाहिजे. अजूनपर्यंत या गोष्टी केल्या नाहीत. त्यामुळे मला पुन्हा निवडणुकीत उभं राहायला लागलं. इतकेच नाही, तर सरकार आनंदाचा शिधा वाटते. रेशन कार्डवर साड्याही मिळतात. जर चंद्रपूरच्या लोकांनी मला खासदार बनवलं तर आनंदाचा शिधासोबत व्हिस्की, बिअर जी काही उच्च दारू आहे, ती माझ्या खासदार निधीतून देईन.” असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. (Vanita Raut)

म्हणे, दारू पिऊन त्यांना शांती मिळते

अखिल भारतीय मानवता पक्षाच्या तिकिटावर त्या (Vanita Raut) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. “गरीब लोक खूप कष्ट करतात. दारू पिऊन त्यांना शांती मिळते. मात्र त्यांना चांगल्या दर्जाची व्हिस्की आणि बिअर खरेदी करता येत नाही. अशा वेळी ते फक्त देशी दारू पितात. याच्या प्रमाणासाठी कोणतीही मर्यादा नाही आणि जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते लोक बेशुद्ध होतात. त्यांनी आयात केलेल्या चांगल्या दारूचा आस्वाद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. लोकांना जास्त दारू पिण्याचे परवाने दिले पाहिजेत. फक्त त्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच हा परवाना देण्यात यावा, असेही वनिता राऊत बरळल्या आहेत. (Vanita Raut)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.