आता ‘वर्षा’ येणार; मुंबई कॉंग्रेसमधील ‘भाई’गिरीला लगाम लागणार

168
आता 'वर्षा' येणार; मुंबई कॉंग्रेसमधील 'भाई'गिरीला लगाम लागणार
आता 'वर्षा' येणार; मुंबई कॉंग्रेसमधील 'भाई'गिरीला लगाम लागणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये फेरबदलांचे संकेत मिळत असतानाच, भाई जगताप यांना मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवत त्यांच्याजागी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘वर्षा’ येणार आणि मुंबई कॉंग्रेसमधील ‘भाई’गिरीला लगाम लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, चरणसींग सप्रा यांच्यासह अनेक नेते इच्छुक होते. मात्र, कॉंग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या रुपाने महिलेला संधी देत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, गायकवाड यांच्यासमोर मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

(हेही वाचा – मुंबईसह राज्यभरातील ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; महाराष्ट्र मंदिर महासंघाची घोषणा)

भाई जगताप यांच्याआधी वर्षा यांचे वडील एकनाथ गायकवाड मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. २०२० मध्ये त्यांना बदलून भाई जगताप यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. परंतु, विधानपरिषद निवडणुकीत पक्षाने तिसऱ्या पसंतीचे उमेदवार घोषित केलेले असताना, जगताप यांनी स्वपक्षीय आमदाराचा पाडाव करीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. तेव्हापासून हायकमांड त्यांच्याविषयी नाराज होते. ती नाराजी अध्यक्षबदलीच्या रुपाने प्रकट झाल्याचे दिसून येत आहे.

गुजरातचे अध्यक्ष बदलले

पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्येही कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जगदीश ठाकोर यांच्याजागी आता खासदार शक्तीसिंह गोयल यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय खासदार व्ही. वैथिलिंगम यांच्याकडे पद्दुचेरीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.