शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) एकच खळबळ उडाली असून मविआतील घटक पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यासंदर्भात खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) म्हणाल्या की, आम्ही मुंबईपासून नागपुरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढावायच्या यावर वरिष्ठांशी बोलणार आहोत. तसेच संजय राऊतांनी आधी चर्चा करायला हवी होती, असे ही गायकवाड (Varsha Gaikwad ) म्हणाल्या.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी का सोडली ? Prakash Ambedkar यांचे खळबळजनक विधान)
दरम्यान वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) म्हणाल्या की, मविआ (Maha Vikas Aghadi) एकत्र राहिली पाहिजे अशीच आमची इच्छा आणि भूमिका असून त्यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करणार आहोत. तसेच उबाठा (Shiv Sena – UBT) पक्षाची महापालिका निवडणुकीच्या भूमिकेसंदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार असून त्यानंतर निर्णय घेऊ, असे ही गायकवाड म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीत मविआला अपेक्षित यश मिळाली नाही. त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे मविआतील (Maha Vikas Aghadi) सर्वच पक्षांची या निवडणुकीच्या अनुषंगाने रणनिती आखली जात आहे. त्यातच विधानसभेला काही ठिकाणी आमच्या जागा निवडून आल्या असत्या. पण आम्ही आघाडी धर्म पाळला, अशी टीका ही गायकवाड (Varsha Gaikwad ) यांनी केली.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community