सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत नाराजी वाढू लागली आहे. जागावाटपात काँग्रेसला जागा सोडावी लागली, त्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज होऊ लागले आहेत. सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेते नॉट रिचेबल झाले. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही दिल्लीला नाराजी कळवली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे (Congress) सचिव के.सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे समजते.
(हेही वाचा Muslim : हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारकडून मुसलमानांचे लांगुलचालन; ईदच्या दिवशी मुसलमान महिलांना मोफत बससेवा )
कोण आहेत नाराज?
मुंबईत काँग्रेसला २ जागा सोडल्यात त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस (Congress) आग्रही होती. या जागेवर वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती. मात्र ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानं नाराजी वाढली आहे.इतकेच नाही तर मविआची पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेत्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. परंतु ज्येष्ठ नेते काही न बोलता निघून गेले. मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड समाधानी नाहीत. ज्या जागा आम्ही निवडून येऊ शकतो त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत. ज्या जागांवर आमची ताकद नाही अशा जागा देण्यात आल्याची तक्रार वर्षा गायकवाड यांची आहे. राहुल गांधी यांची मुंबईत यात्रा आली, तेव्हा धारावीतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस (Congress) आग्रही होती. परंतु तिथे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना मविआकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community