ईडी चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणात राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा देखील सहभाग असल्याचा संशय असल्याने ईडीने शनिवारी वर्षा राऊत यांची तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या वर्षा राऊत?

काहीही झालं तरी आपण कायम उद्धव ठाकरे यांच्याशी पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यामुळे आम्ही पक्ष सोडणार नसल्याचे वर्षा राऊत यांनी सांगितले आहे. तसेच आपण ईडीला चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार असून ईडीने दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिली असल्याचे वर्षा यांनी सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याच्या तपासादरम्यान वर्षा राऊत यांचे नाव तपास यंत्रणेच्या समोर आले होते. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपांचा सामना करत असलेले प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हा व्यवहार गोरेगावच्या पत्राचाळशी संबंधित आहे. जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने तपास सुरू केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने गुरूवारी समन्स बजावले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here