पुन्हा आला तर वरुण माघारी जाणार नाही! नारायण राणेंचा इशारा

आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकले. ही प्रकरणे मी टप्प्याटप्प्याने काढणार, असे नारायण राणे म्हणाले. 

101

युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. मात्र यावरुन नारायण राणे यांनी थेट वरुण सरदेसाई यांना इशारा दिला आहे. वरुण आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशाराच राणेंनी यावेळी दिला.

काय म्हणालेत राणे?

आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट. कुठल्याही नेत्याला जो पोलिस बंदोबस्त नाही तेवढा त्याला आहे. तरी त्याने मार खाल्ला. एवढे पोलिस असून तिथल्या मुलांनी एव्हढा चोपला ना…आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, आम्ही नाही सोडणार आणि तो वरुण येऊ देच, असे राणे म्हणाले.

वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले?

आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळाले. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचे कारण काय आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अ‍ॅसिड फेकायला कुणी सांगितले पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकले. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार, पुष्कळ मसाला आहे ३९ वर्षे होतो सोबत, पुढच्या वेळी सर्व माजी आमदार – खासदार हे औषधालाही उरणार नाही, असे काम करा, असे राणे म्हणाले.

सुशांतची केस संपली नाही!

सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका, असे राणे म्हणाले. कोकणात शिवसेना औषधालाही राहणार नाही, असे काम करा. एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. लक्षात गह्य आम्ही घरात बसून काम करणारे नाही, असेही राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.