मनसेचा पुण्यातील फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी अखेर मंगळवारी, १२ मार्च रोजी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. सोशल मीडियात त्यांनी त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे मनसेचे पुण्यात मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा … pic.twitter.com/25IQRaLfXQ
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 12, 2024
मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने झालेली कारवाई
वसंत मोरे (Vasant More) हे तीन वेळा नगरसेवक होते, तसेच हडपसरमधून विधानसभा निवडणूकही लढवली होती. वसंत मोरे हे जनसामन्यांशी मोठा संपर्क असलेला नेते आहेत. मात्र दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्याला वसंत मोरे (Vasant More) यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करून त्याजागी साईनाथ बाबर यांना अध्यक्ष बनवले होते. तेव्हापासून वसंत मोरे हे वारंवार त्यांची नाराजी व्यक्त करत होते. लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे (Vasant More) उत्सुक असतानाही पक्षाकडून मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता. तसेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून प्रतिसाद मिळत नाही. स्थानिक पातळीवर वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याविरोधात गलिच्छ राजकरण सुरु आहे, त्यामुळे आपण मनसेला सोडून जात आहे, अशी भूमिका वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. त्यामुळे आता वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
Join Our WhatsApp Community