Vasant More यांचे WhatsApp स्टेटस चर्चेत; लोकसभेच्या उमेदवारीसाठी थेट पक्ष नेतृत्वाला दिला इशारा

408
बुधवार, ७ फेब्रुवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पुण्यात गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत बोलताना साईनाथ बाबर दिल्लीत गेले तर दुधात साखर पडेल असे सांगत साईनाथ बाबर यांच्या लोकसभेसाठीच्या उमेदवारीचे संकेत दिले. त्यामुळे आता मनसेचे पुण्यातील ज्येष्ठ नेते वसंत मोरे (Vasant More) नाराज झाले आहेत. त्यांनी थेट  WhatsApp स्टेटस वरून वरिष्ठांना इशाराच दिला आहे. तसेच ‘आता सगळेच बोलू लागले आहेत पुण्याची पसंत वसंत’ असेही स्टेटस वसंत मोरे  (Vasant More) यांनी ठेवले आहे.
सध्या पुण्यात वसंत मोरे (Vasant More) आणि साईनाथ बाबर यांच्यात येथील लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. अशा वेळी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या बाजूने संकेत दिल्याने वसंत मोरे नाराज आहेत. कालपासून ते WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत आहेत. ‘कुणासाठी किती बी करा राव वेळ आली कि फणा काढतातच पण एक लक्षात ठेवा मी बी पट्टीचा गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार’, असा आशयाचे  WhatsApp स्टेटस मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे  (Vasant More) यांनी ठेवल्याने खळबळ उडाली आहे. शर्मिला ठाकरे यांनी पुण्यातून साईनाथ बाबर यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे संकेत दिल्याने वसंत मोरे नाराज आहेत.

मनसे नेतृत्व का आहे वसंत मोरेवर नाराज? 

जेव्हा राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, तेव्हा वसंत मोरे यांनी विरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून वसंत मोरे  (Vasant More) यांच्याविषयी नेतृत्व नाराज होते. त्याच वेळी मनसेच्या पुण्यातील अध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची हकालपट्टी करून साईनाथ बाबर यांची नियुक्ती केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.