वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातकडे गेला, असा आरोप करत विशेषतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते राज्याचे मुख्यमंत्री यांना लक्ष्य करत आहेत. मात्र वेदांताचे संचालक अनिल अग्रवाल यांनी शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीच हा प्रकल्प गुजरातला पाठवण्याचा निर्णय झाला होता, असे स्पष्ट ट्विट केले. त्यावर भाजपाने राष्ट्रवादीवर प्रतिहल्ला केला.
अनिल अग्रवाल त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हणाले?
दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्यातील मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गुजरातकडून त्यांना सर्वोत्तम डील मिळाली. जुलैमध्ये गुजरात सरकारशी त्यांची चर्चा सुरु होती आणि त्यावेळीच त्यांचा करार निश्चित झाला. मात्र जुलै महिन्यात महाराष्ट्रात नवीन सरकार आले. शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आले. हे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनीही हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा म्हणून चर्चा करुन प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत गुजरात सरकारने त्यांना दिलेली ऑफर आणि सवलत त्यांनी मान्य केली. त्यांनी गुजरातमध्ये हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली आहे.
काय म्हटले भाजपाने त्यांच्या ट्विटमध्ये?
अनिल अग्रवाल यांच्या ट्विटमुळे शिंदे-फडणवीस सरकारला बळ मिळाले, त्यामुळे महाराष्ट्र भाजपाने लागलीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ट्विटवर वरूनच पलटवार केला. काही महिन्यापूर्वीच ‘वेदांत-फॉक्सकॉन’चा प्लांट गुजरातमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अग्रवाल (चेअरमन) म्हणाले. उद्धवा ठाकरे मुख्यमंत्री असतानाच कंपनीने गुजरातमध्ये करण्याची निर्णय घेतला. राष्ट्रवादीला उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवताना लाज वाटली नव्हती का?, असा प्रश्न विचारला.
काही महिन्यापूर्वीच 'वेदांत-फॉक्सकॉन' चा प्लांट गुजरातमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
– अनिल अग्रवाल (चेअरमन)@OfficeofUT मुख्यमंत्री असतानाच कंपनीने गुजरातमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला.@NCPspeaks उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवताना लाज वाटली नव्हती का? pic.twitter.com/tXXN1KPGjg
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 15, 2022
@OfficeofUT मुख्यमंत्री असतानाच कंपनीने गुजरातमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
@NCPspeaks उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटके ठेवताना लाज वाटली नव्हती का?
Join Our WhatsApp Community