आंबेडकर – सावरकर वैचारिक साम्यता…

सर्वसामान्यपणे सुरुवातीपासून भारतीय जनमाणसाचा ढोबळपणे असा ग्रह करून देण्यात आला आहे की, आंबेडकरी विचारधारा आणि सावरकरी विचारधारा या परस्परविरोधी आहेत, पण सूक्ष्मपणे पाहिले असता त्या दोन विचारधारा विरोधी वा पृथक नसून परस्पर पूरक असण्याच्या पलीकडे जाऊन एकच आहेत…कारण त्याचे मूळ तत्व हा भारतीय राष्ट्रवाद आहे…

सावरकराचे हिंदुत्व असो वा आंबेडकराचे बौद्धत्व असो, दोन्हींचे मूळ तत्व आणि रंग एकच आहे…भगवा!

भगवा हा शुद्ध पाली शब्द आहे. ज्याचा अर्थ आहे…गौतम बुद्ध.
आणि सावरकर यांच्या हिंदुत्वाचे भव्य रूप आहे…भगवा

(हेही वाचा होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!)

अर्थात भारतीय राष्ट्रवाद म्हणजे केवळ भगवा होय!

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बुद्धांनी अर्थात भगवा गौतम बुद्धांनी सांगितलेल्या तत्वावरच अर्थात भगवा राष्ट्रवादावरच या भारतीय राष्ट्राची उभारणी होऊ शकते. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय ऐक्य आणि एकतेसाठी ‘भीमविनायक’ अर्थात आंबेडकर-सावरकर हे विचार व अनुयायी एकत्र येणे, ही काळाची गरज आहे.

नमो भगवाय
जय भारत

– राज बनसोडे
भीमविनायक विचार मंच प्रणित
भगवा भारत अभियान

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here