वीर सावरकर आमच्यासाठी दैवत, त्यांचा अवमान सहन करणार नाही!

हे सरकार शरद पवारांचेही आहे आणि काँग्रेसचेही, पण मुख्यमंत्री सेनेचा आहे आणि ठाकरे नावाला वलय आहे म्हणून 'ठाकरे सरकार'! ठाकरे नावाशिवाय देशात दुसऱ्या कोणत्या नावाला वजन आहे का?, असे संजय राऊत म्हणाले.

111

वीर सावरकर आमच्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत, आमच्यासाठी ते दैवत आहे. हे काही लपवायची गोष्ट आहे. इंस्टाग्रामवर काँग्रेसने वीर सावरकर यांचा अवमान केला असेल, पण आपण ते पाहिले नाही, पण आम्ही कधीही वीर सावरकर यांचा अपमान सहन केला नाही आणि करणारही नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. टीव्ही ९ या वृत्त वहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

ठाकरे नावाशिवाय देशात दुसऱ्या कोणत्या नावाला वजन आहे? 

हे सरकार ठाकरे सरकार म्हणून ओळखले जात असेल, तर कुणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही. आघाडीचे सरकार असले तरी ते सरकार मुख्यमंत्र्यांच्याच नावाने ओळखले जाते. रालोआचे सरकार ३२ पक्षांचे होते. तेव्हा त्याचा उल्लेख वाजपेयी सरकार असाच व्हायचा. मागील सरकारमध्येही अनेक पक्ष सहभागी होते, तेही मोदी सरकार, फडणवीस सरकार म्हणून ओळखले जात होते. तसे हे ठाकरे सरकार! हे सरकार शरद पवारांचेही आहे आणि काँग्रेसचेही, पण मुख्यमंत्री सेनेचा आहे आणि ठाकरे नावाला वलय आहे म्हणून ‘ठाकरे सरकार’! ठाकरे नावाशिवाय देशात दुसऱ्या कोणत्या नावाला वजन आहे का?, असेही राऊत म्हणाले. ईडी, सीबीआय ह्या भाजपाच्याच शाखा आहेत. मला तर माझे कपडे लॉंड्रीत टाकायलाही भीती वाटते. मनी लॉन्डरिंगची केस होईल की काय अशी भीती वाटते, इतके लोक घाबरले आहेत, अशी मार्मिक टीकाही राऊत यांनी यावेळी केली.

(हेही वाचा : काँग्रेसचा खोडसाळपणा! वीर सावरकरांचा पुन्हा केला अवमान!)

राणेंचा औषधाचा कारखाना बघावा लागेल!

कोकणात निर्विवाद वर्चस्व शिवसेनेचे आहे, हे नारायण राणेंनीही माहित आहे. कोकणात आणि मुंबईत दोन्हीकडे राणेंचा पराभव सेनेने केला आहे. लोकसभेला केला आहे. त्यामुळे शिवसेना कोकणात औषधालाही दिसणार नाही, असे जर राणे म्हणत असतील तर त्यांचा औषधाचा कारखाना आहे कुठे बघावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.