संसदेच्या १२ निलंबित सदस्यांपैकी सीपीआयचे खासदार बिनॉय विषम आणि सेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला, याप्रकरणी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्न आहेत, त्यांचा अवमान करू नका, अशा शब्दांत फडणवीस यांनी सेनेला खडसावले.
सेनेचे सावरकरांप्रती बेगडी प्रेम
गुरुवार, २ डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी यांनी शिवसेनेला अशा खरमरीत शब्दांत सुनावले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्याच्या आहेत. त्यावर माध्यमांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांना राज्यसभेच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. तेव्हा सीपीआयचे खासदार बिनॉय विषम आणि सेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘आम्ही माफी मागायला सावरकर नाही’, असे अवमानकारक वक्तव्य केले. त्यावर माध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणाले, यावरून शिवसेनेचे वीर सावरकर यांच्यावरील बेगडी प्रेम दिसून येत आहे, एका बाजूला सावरकर यांच्याविषयी आदर आहे, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजुला त्यांचा अवमान करायचा. शिवसेना अशा वेळी सावरकरांच्या भारतरत्नाचा मुद्दा उपस्थित करून पळ काढते, खरे तर वीर सावरकर हे पर्मनंट भारतरत्न आहेत, त्यांचा अवमान करू नका, असे फडणवीस यांनी खडसावले.
Join Our WhatsApp Community