वीर सावरकरांची ब्रिटिशांना जशी दहशत तशी काँग्रेसला

78

देश स्वतंत्र झाल्यानंतर ७५ वर्षांनी पहिल्यांदा शासकीय पातळीवर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धाडस करतात हे विशेष. हा गौरव का करायचा, कारण स्वातंत्र्यानंतर वीर सावरकर यांना जाणीवपूर्वक गांधी हत्येत अडकवण्यात आले, त्यांना बदनाम करण्यात आले. संपूर्ण निर्दोष मुक्तता होऊनही काँग्रेसचे नेते आजही त्यांना गांधी हत्येचे मारेकरीच म्हणतात, म्हणून खरे खुरे सावरकर सांगण्यासाठी ही यात्रा काढणे आवश्यक आहे.

१८८३ रोजी जन्म झाल्यानंतर काही वर्षातच वीर सावरकर यांनी देवीच्या समोर स्वातंत्र्यसाठी शपथ घेतली, तेव्हापासून या तिन्ही भावांनी आयुष्याचा विचार केला नाही, संपूर्ण आयुष्याची स्वातंत्र्याच्या यज्ञ कुंडात आहुती दिली. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळाले काय, तर २ वर्षांचा कारावास. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानाचा पंतप्रधान लियाकत अलीला नेहरूंनी भारतात बोलावले, चार दिवस त्याचा पाहुणचार केला, पण त्याआधी त्यांच्या दौऱ्यात अडसर येऊ नये म्हणून वीर सावरकर यांना बेळगावच्या कारागृहात ठेवले, तो लियाकत अली आलाच नसता तर काय फरक पडला असता. तो येऊन गेला तरी १५ दिवस वीर सावरकर तुरुंगातच होते, त्यांना कारागृहात ठेवले हे विसरून गेले होते. त्यावेळी सावरकरांना ते किती घाबरत होते, ब्रिटिशांना त्यांची दहशत होतीच त्यानंतर काँग्रेसला झाली होती. कारण १९४७ साली जे सरकार येणार होते ते निवडून येणार होते. स्वातंत्र्याआधी जे सरकार निवडून आले त्यामागे गांधींनी देशाला ब्लॅकमेल केले होते. देहाचे तुकडे झाले तरी देशाचे तुकडे होऊ देणार नाही असे ते देशवासियांना म्हणाले होते. कारण त्यावेळी गांधी देशाचे नेते होते.

(हेही वाचा कितीही गौरव यात्रा काढल्या, तरी वीर सावरकरांच्या कार्यापुढे त्या कमीच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

हिंदू नेते आणि नियतीचा खेळ

कोणताही नेता साधारण वयाच्या २७ ते ५० या काळात नेता म्हणून तयार होतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यापासून अनेक जण या वयात नेतृत्व करू लागले. पण वयाच्या याच काळात वीर सावरकर कारागृहात होते. हिंदूंचे दुर्भाग्य बघा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, वासुदेव फडके हे सगळे तरुण वयात गेले, सावरकर ५० वर्षे तुरुंगात राहिले. जे जे नेते हिंदू राष्ट्राच्या समीप घेऊन जाणारे नेते बनले नियतीने आमच्यापासून ते हिरावून घेतले. म्हणून मी रोज सकाळी देवाला प्रार्थना करतो की, दिल्लीत जो माणूस आला आहे त्याला आमचे आयुष्य दे.

वीर सावरकरांनी कृष्ण आणि राम एकत्र आणले

वीर सावरकर यांची बदनामी होत आहे याला पांढरपेशा समाज कारणीभूत आहे, तो बोलतच नाही, ‘मला काय त्याचे’ ही त्याची वृत्ती कारणीभूत आहे. हिंदू असे अहिंसवृत्तीचे असतात. हिंसा नको, असे म्हणतात. राजाला नि:शस्त्र होण्याचा अधिकार नाही, अहिंसक होण्याचा अधिकार राजाला नसतो. प्रजेचे रक्षण करणारा राजा हा शस्त्रधारीच असतो. एकही भजन न म्हणता राम आणि कृष्ण एकत्र आणणारे वीर सावरकर होते. श्रीराम, श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, वासुदेव फडके, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, आंबेडकर, फुले, शहाजी राजे सगळे हिंदू धर्मातच जन्माला आले.

मुसलमानांमध्ये कोण जन्माला आला अफझलखान… तरीही आपण एसीच्या खोलीत बसून सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी करतो. ‘जो हिंदू हित कि बात करेगा, वही देश पे राज करेगा’, हे वाक्य घराघरात लिहून ठेवले पाहिजे. २०१९ ला सगळे १९ पक्ष एकत्र आले होते, काय झाले, मोदी पुन्हा आले ३०० वरून ४०० जागा घेऊन आले. त्यामुळे या सावरकर गौरव यात्रेचा निश्चित फायदा होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.