Veer Savarkar Jayanti 2023 : वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने भगूरपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन

नाशिक भाजपा शहर कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात झाली. त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

151

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक येथून वीर सावरकर यांचे जन्मस्थळ भगूरपर्यंत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांचा सहभाग होता.

नाशिक भाजपा शहर कार्यालयापासून या रॅलीची सुरुवात झाली. त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. ‘मी सावरकर’ नावाच्या टोप्या घालून कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी झाले होते. आज श्रद्धेय वीर सावरकर यांची जयंती आहे. आजचा प्रेरणा देणारा दिवस आहे. ज्या ठिकाणी हा तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि पिढ्यान पिढ्या युवाशक्तीला प्रेरणा देणाऱ्या वीर सावरकर यांच्या जनस्थळी भगूर येथे आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी जात आहोत, आम्ही सगळी नाशिकची युवाशक्तीला राष्ट्रवंदना करण्यासाठी जात आहोत, असे भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar Jayanti 2023 : महाराष्ट्र सदनात प्रथमच वीर सावरकर जयंती साजरी; हा दिवस गौरव दिन म्हणून साजरा होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.