पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटने शुक्रयान व्हिनस ऑर्बिटर मिशनला (Venus Orbiter Misson ) ला मंजुरी दिली आहे. शुक्र (Venus) हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे. या मोहिमेद्वारे शुक्र या ग्रहाचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासाद्वारे शुक्र ग्रहाबाबत माहिती मिळू शकणार आहे. ही मोहीम शुक्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाची असणार आहे. Venus Orbiter Misson साठी एक खास अंतराळयान तयार केलं जाईल. हे अंतराळयान शुक्राच्या कक्षेत फिरुन त्याचा अभ्यास करणार आहे. शुक्र ग्रहावर काय स्थिती आहे. त्याचे चंद्र कुठले? सूर्याचा शुक्रावर कसा प्रभाव पडतो? असं सांगितलं जातं की शुक्र हा मानवी वस्तीसाठी योग्य असा ग्रह होता. मात्र नंतर इथली स्थिती बदलली. ती कशी बदलली त्याचाही अभ्यास या मोहिमेत केला जाणार आहे. (ISRO)
‘ही’ माहिती मिळणार
शुक्रयानाचं वजन २५०० किलो असणार आहे. त्यामध्ये १०० किलोंचे पेलोड्स असतील. या शुक्रयानात जर्मनी, स्वीडन, फ्रान्स, रशिया यांचेही पेलोड्स असण्याची शक्यता आहे. या शुक्रयानाचं आयुष्य चार वर्षांचं असेल. शुक्रयान GSLV Mark II या रॉकेटने हे यान लाँच केलं जाईल अशी शक्यता आहे. शुक्रयान अंतराळात गेल्यानंतर शुक्र ग्रहाची संरचना, ज्वालामुखीचं प्रमाण तिथे आहे का? असल्यास ते कसं आहे? शुक्राच्या पृष्ठभागावर असलेला गॅस, त्याचं उत्सर्जन, हवेची गती, ढगांची गती या सगळ्याचा अभ्यास करणार आहे. शुक्रयान शुक्राच्या अंडाकार कक्षेत चारही बाजूनी चक्कर लगावणार आहे. (ISRO)
डॉ. एस सोमनाथ यांची माहिती
Venus Orbiter Misson साठीचं स्पेसक्राफ्ट तयार करणं आणि ते लाँच करणं याची जबाबदारी ISRO ची असणार आहे. ही मोहीम २०२८ मध्ये लाँच केली जाईल अशी चर्चा आहे. या योजनेसाठी १२३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुक्रयान स्पेसक्राफ्टसाठी यातले ८२४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ म्हणाले शुक्र हा अंतराळातील महत्त्वाचा ग्रह आहे. त्याचा अॅसिडिक गुणधर्म कसा आहे? हे तपासण्यासाठी मोहीम आवश्यक आहे. शुक्र ग्रहावर वायमंडळीय दबाव पृथ्वीपेक्षा १०० पटींनी जास्त आहे. अशी माहिती सोमनाथ यांनी मागील वर्षी दिली होती. (ISRO)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community