देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांची धाकधूक वाढली असून निवडणूक प्रचाराची घोषणा झाल्यापासून आपल्या विजयाचा दावा करणाऱ्या पक्षांसमोर सत्य येणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी झाल्यानंतर त्यांच्या दाव्याची ताकद नेमकी काय होती हे सत्य उघड होईल.
कोणाची लागणार कसोटी
दरम्यान, आज देशातील सर्वात मोठ्या पक्षाची म्हणजेच भारतीय जनता पक्षाची सर्वात मोठी कसोटी लागणार आहे. पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्ता मिळवणे त्यांच्यासाठी सोपं नसलं तरी अवघड देखील नाही. त्यामुळे याकडे समस्त जनतेच्या लक्ष लागले आहे. भाजपनंतर काँग्रेससमोरील मोठे आव्हान प्रत्येक निवडणुकीत कमकुवत होत आहे. पंजाबमध्ये पुन्हा सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी कमी अवघड नाही तर तिसरा पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष. उत्तर प्रदेशात भाजपच्या निरोपाचे ढोल बडवणाऱ्या सपाने केवळ बहुमताची स्वप्ने बघून थांबणं योग्य नाही, तर काही जागा वाढवणे ही त्यांच्यासाठी दिलासादायक बाब ठरेल. बसपा आणि इतर पक्षांना काही जागा मिळाल्या तरी त्यांनी समाधान मानावे.
निवडणूक आयोग मजमोजणीसाठी सज्ज
निवडणूक आयोगाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात होणार आहे. प्रथम मतपत्रिकांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएमवर मतमोजणी करण्यात येईल. गुरुवारी निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन तयारीची माहिती दिली. आयोगाच्या म्हणण्यानुसार, पाच राज्यांतील 690 विधानसभा जागांवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी एकूण 671 मतमोजणी निरीक्षक, 130 पोलीस निरीक्षक आणि 10 विशेष निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रणालीवर देखरेख ठेवण्यासाठी आयोगाने दोन सीईओ दिल्ली ते मेरठ आणि सीईओ बिहार वाराणसी येथे नियुक्त केले आहेत.
सीआरपीसीचे कलम 144 लागू
आयोगाने सांगितले की, सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व स्ट्राँग रूम, जेथे EVM ठेवलेले आहेत, केंद्रीय सशस्त्र दलांनी आतील गराडा असलेल्या त्रिस्तरीय सुरक्षेखाली आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्ट्राँग रूमच्या व्यवस्थेवर संबंधित उमेदवार 24 तास लक्ष ठेवून आहेत. मतदान राज्यांमध्ये, शांतता भंग होणार नाही याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतमोजणी सभागृहांभोवती सीआरपीसीचे कलम 144 लागू केले आहे.