- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वर्सोवा विधानसभेमध्ये ना राजुल पटेल, ना राजू पेडणेकर, ना शैलेश फणसे, ना देवेंद्र आंबेरकर, ना काँग्रेसला ही जागा सोडली. वर्सोवा विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेने स्वत: कडे ठेऊन थेट माजी नगरसेविका शाहीदा हारुन खान यांचे पती आणि पक्षाचे पदाधिकारी हारुन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, राजुल पटेल यांना उमेदवारी दिल्यास मी बंडखोरी करेन असा इशारा देणाऱ्या राजू पेडणेकर यांनी हारुन खान यांच्या उमेदवारीनंतरही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली. त्यामुळे या मतदारसंघातून आजवर कट्टर आणि निष्ठावान राजुल पटेल यांचा पत्ता पक्षाने कापून त्यांना राजकारणातून उठवून टाकले आहे. (Versova Assembly Constituency)
जिथे शिवडीत साळवी यांच्या दबावानंतरही विद्यमान आमदार अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलेली असतानाही वर्सोव्यात राजुल पटेल यांना उमेदवारी न देता हारुन खान यांना उमेदवारी देत एकप्रकारे डॉ. भारती लव्हेकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला आहे. वर्सोवा विधानसभेतून भाजपाच्यावतीने डॉ. भारती लव्हेकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या विधानसभेतून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने हारुन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मनसेच्यावतीने संदेश देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Versova Assembly Constituency)
(हेही वाचा – Assembly Election : अखेर काँग्रेस १०० पार; महाविकास आघाडीतल्या जागावाटपात ठाकरे-पवारांवर मात!!)
या वर्सोवा विधानसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने या मतदारसंघातून २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज बाद झालेल्या आणि सन २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या रणरागिणी आणि निष्ठावान शिवसैनिक असलेल्या महिला विभागप्रमुख राजुल पटेल या प्रबळ दावेदार असताना प्रत्यक्षात हारुन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उबाठा शिवसेनेने हारुन खान यांना उमेदवारी जाहीर केल्याने भाजपाने या मतदारसंघातून पुन्हा एकदा डॉ. भारती लव्हेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हारुन खान यांच्या उमेदवारीमुळे लव्हेकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. लव्हेकर यांना राजुल पटेलच कडवी झुंज देणाऱ्या होत्या. परंतु राजू पेडणेकर आणि राजुल पटेल यांच्या वादाचा फायदा उचलत हारुन खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Versova Assembly Constituency)
परंतु राजुल पटेल यांना उमेदवारी दिल्यास आपण बंडखोरी करू असा इशारा देणाऱ्या राजु पेडणेकर यांनी हारुन खान यांच्या उमेदवारीनंतरही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे राजू पेडणेकर यांना कुणाची साथ आहे तसेच उबाठा शिवसेनेने भाजपासोबत असलेली मैत्रीला जागत लव्हेकर यांचा मार्ग सुकर केला. (Versova Assembly Constituency)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community