Versova Assembly Constituency : वर्सोव्यात विद्यमान आमदारांची वाट बिकट

184
Versova Assembly Constituency : वर्सोव्यात विद्यमान आमदारांची वाट बिकट
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वर्सोवा विधानसभा क्षेत्रात मागील दोन टर्म आमदार म्हणून निवडून येणाऱ्या भाजपाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना यंदा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रविंद्र वायकर हे वर्सोव्यात सुमारे २२ हजार मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे सन २०१९ च्या निवडणुकीत लव्हेकर यांना काठावर मिळालेला विजय आणि आता लोकसभेत या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना कमी मिळालेली मते तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी नसलेला समन्वय यामुळे लव्हेकर यांच्या मार्गातील अडचणी अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा तिसऱ्यांदा लव्हेकर यांना संधी देते की नवीन चेहरा देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Versova Assembly Constituency)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी ३ परम रुद्र कॉम्प्युटरचे केले उद्घाटन; जाणून घ्या याचे वैशिष्ट्ये)

वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सन २००९मध्ये काँग्रेसचे उमेदवार बलदेव खोसा हे १२ हजार मतांनी निवडून आले होते. हा मतदारसंघ तेव्हा शिवसेना भाजपा युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने यशोधर फणसे यांना उमेदवार दिली होती. त्यामुळे फणसे यांनी खोसा यांना कडवे आव्हान दिले होते. परंतु त्यांना बारा हजार मतांनी पराभव झाला होता. परंतु त्यानंतर सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महायुती स्वतंत्र निवडणूक लढल्यानंतर ही जागा भाजपाने शिवसंग्राम पक्षासाठी सोडली होती. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांना उमेदवारी जाहीर झाली, परंतु त्याच वेळी शिवसेनेच्या राजुल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला गेला. त्यात भाजपाच्या लव्हेकर आणि खोसा यांच्या प्रमुख लढत झाली आणि तब्बल २६ हजारांच्या मताधिक्याने लव्हेकर या विजयी झाल्या होत्या. (Versova Assembly Constituency)

(हेही वाचा – सरकारी शाळेतील शिक्षिका आसमा आणि शगुफ्ता विद्यार्थ्यांना Namaz अदा करण्यासाठी करायच्या जबरदस्ती; शिक्षण विभागाने केले निलंबित)

परंतु सन २०१९च्या वर्सोवा विधानसभेत महायुती झाल्याने विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यामुळे लव्हेकर यांच्यापेक्षा केवळ ५ हजार मतेच खोसा यांना कमी पडली आणि त्यांचा पराभव झाला. परंतु राजुल पटेल यांना ३२,७०६ मते मिळाली. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना ५९,३९७ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ८०,४८७ मते मिळाली. म्हणजे तब्बल या मतदारसंघात महायुती सुमारे २२ हजार मतांनी पिछाडीवर असल्याने लव्हेकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे लव्हेकर यांचे स्थानिक भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीच पटत नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणी अधिकच वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लव्हेकर यांना आता पुन्हा उमेदवारी मिळते का हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. (Versova Assembly Constituency)

(हेही वाचा – Ban On Digital Notes, ‘या’ राज्याने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय)

सन २०१९ : डॉ. भारती लव्हेकर, भाजपा (५१८६ मताधिक्य)

सन २०१४ : डॉ. भारती लव्हेकर, भाजपा (२६,३९८ मताधिक्य)

स २००९ : बलदेव खोसा, काँग्रेस (१२,०३० मताधिक्य)

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत वर्सोव्यात मिळालेली उमेदवारनिहाय मते

अमोल किर्तीकर, उबाठा शिवसेना : ८०,४८७

रविंद्र वायकर, शिवसेना : ५९,३९७ (Versova Assembly Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.