मराठवाडा विद्यापीठात उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांचं घुसखोरांवर मोठं विधान; म्हणाले, देशातून…

53

Jagdeep Dhankhar : विदेशात बेकायदेशीपणे राहणाऱ्या घुसखोरांना (infiltrators) बाहेर पाठवण्याचं काम कधीच सुरू झालं आहे. आपल्या देशात ही प्रक्रिया कधी सुरू होणार? असा प्रश्न प्रत्येक भारतीयांना पडला पाहिजे, असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनगड (Vice President Jagdeep Dhangad) यांनी देशात बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांबाबत मोठं विधान केलं आहे. उपराष्ट्रपती (Vice President) २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला (Marathwada University 65th Convocation) संबोधित करत होते.  (Jagdeep Dhankhar)

मराठवाडा विद्यापीठात (Marathwada University) संबोधित करताना उपराष्ट्रापती जयदीप धनखड म्हणाले, की आम्ही भारतीय आहोत. राष्ट्रवाद आमचा धर्म आहे. आमचे संविधान आणि संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना रोखायचे आहे. सजग राहा, विचार करा. देशाला आणि लोकशाहीला बाधा पोहोचवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. देशात बाहेरील कोट्यवधी लोक येऊन राहत आहेत. त्यांनी व्यवसाय सुरू केले, एवढेच नव्हे तर लोकशाही व्यवस्थेत ते निर्णायक बनत आहेत. काही देशांनी भारतीयांना परत पाठवले, आपणही आता घुसखोरी  (infiltrators) करणाऱ्यांना परत पाठवण्याची सुरुवात करायला हवी. प्रलोभने दाखवून ते धर्मपरिवर्तन करुन बहुमत, संख्याबळ वाढवत आहेत. तसेच इलेक्शनमध्ये फेरफार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे वेळीच रोखणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले.

(हेही वाचा – Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : राजधानीतील ग्रंथ नगरीत वाचकांची झुंबड)

या वेळी बोलताना धनखड म्हणाले की, देशाला बाधा पोहोचवणाऱ्या शक्तींना ओळखून त्याचा सखोल तपास करण्याची गरज आहे. धर्मपरिवर्तन (conversion) करणाऱ्या शक्तींना ओळखून त्यांना उघड पाडण्याची गरज आहे. या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड, कुलगुरू डॉ. विजय फुलारी उपस्थित होते.

(हेही वाचा –  Rahul Gandhi यांनी शिक्षेच्या स्थगितीला आव्हान देण्यास उशीर का केला?)

दीक्षांत झाला म्हणजे शिक्षण संपत नाही 
पालक, प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानं आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांनी यश मिळते. दीक्षांत समारंभ झाला म्हणजे शिक्षण संपलं असे होत नाही, शिक्षण हे आयुष्यभर सुरूच राहणार आहे. जीवनात सातत्यानं ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून विद्यापीठाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपती धनखड यांनी केलं.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.