उपराष्ट्रपती पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा जगदीप धनखड मुंबईत

174

उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच जगदीप धनखड यांचे आज मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. जगदीप धनखड यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड देखील आल्या आहेत. दरम्यान त्यांच्या स्वागताला पर्यटन मंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव नंद कुमार आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

https://twitter.com/VPSecretariat/status/1614243872472981504?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1614243872472981504%7Ctwgr%5E669a2b509a6d84f88ec3f07f5ed5f791f5d94b90%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D1891271

उपराष्ट्रपतींनी सपत्निक सिद्धिविनाकायचे घेतले दर्शन

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महालक्ष्मी रेसकोर्स येथे वार्षिक आदित्य बिर्ला स्मृती चषक पोलो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. त्यापूर्वी जगदीप धनखड यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिराला भेट दिली आणि सपत्निक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आंदेश बांदेकर उपस्थितीत होते. त्यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

(हेही वाचा – सत्यजित तांबेंना भाजपाचा उघड पाठिंबा की छुपा? १६ जानेवारीला दिल्लीत होणार फैसला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.