यंदाच्या होळीला निर्बंध शिथील असल्याने, होळी दणक्यात साजरी केली जाणार आहे. हिंदूच्या सणातील एक महत्वाचा सण असणा-या होळीच्या शुभेच्छा उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा देत, आपल्या समाजाला एकत्र आणणाऱ्या मैत्री आणि सलोख्याचे बंध अधिक दृढ करूया,असं त्यांनी म्हटलं आहे.
उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छा
होळीनिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. एका विशेष संदेशात नायडू म्हणाले, “रंगाचा सण असलेल्या होळीच्या पवित्र प्रसंगी देशातल्या जनतेला शुभेच्छा. देशभरात पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण म्हणजे कुटुंबीय आणि मित्र परिवाराने एकत्र येऊन उत्साह आणि आनंदाने साजरा करण्याचा सण. होलिका दहन म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवर सुष्टाच्या विजयाचे प्रतिक आहे. होळीच्या या पवित्र सणानिमित्त आपल्या समाजाला एकत्र आणणाऱ्या मैत्री आणि सलोख्याचे बंध अधिक दृढ करूया. हा सण आपल्या जीवनात शांतता, सलोखा, प्रगती आणि आनंदाची उधळण करणारा ठरावा अशी सदिच्छा, “असे नायडू यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे.
( हेही वाचा: सिंधुदुर्गातील ‘ही’ पाच गावे शिमग्यापासून राहणार वंचित! )
जाणून घ्या होळीचे शास्त्र
गुरुवारी होळी आणि शुक्रवारी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. दरवर्षी होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला सूर्यास्तानंतर पौर्णिमा 17 मार्च 2022 रोजी दुपारी 01:29 पासून सुरू होईल आणि 18 मार्च 12:52 पर्यंत राहील. पण भद्रकाल 17 मार्च रोजी 01:20 पासून सुरू होईल आणि रात्री 12:57 पर्यंत राहील. होलिका दहन वेळ संशयात राहते. शास्त्रात भद्रकाल हा अशुभ काळ सांगितला असून, या काळात कोणतेही शुभ कार्य न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर या काळात तुम्ही होलिका दहन करणार असाल, तर या काळात तुम्ही नक्की काळजी घ्या. भद्र काळात कोणतेही शुभकार्य करू नये असे शास्त्रात सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community