महाराष्ट्रातील विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला; Virendra Sachdeva यांनी व्यक्त केल्या भावना

37
महाराष्ट्रातील विजयामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला; Virendra Sachdeva यांनी व्यक्त केल्या भावना
  • प्रतिनिधी 

दिल्ली जिंकायला महाराष्ट्रातील मराठी व्यक्ती पूर्णपणे मदत करू शकतात. कारण राजधानीत मोठ्या संख्येने मराठी नागरिक वास्तव्य करतात. यामुळे एका व्यक्तीने भाजपाला मतदान करण्याचे आव्हान करण्यासाठी दहा फोन जरी केले, तरी भाजपाच्या यशात मोठा वाटा असेल, असे आव्हान करतानाच महाराष्ट्रातील विजयामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम्हाला आत्मविश्वास मिळाला आहे, असे प्रतिपादन दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा (Virendra Sachdeva) यांनी मकरसंक्रांती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमात बोलताना केले. दिल्ली भाजपाच्या मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा – Karnataka Accident : कर्नाटकात भीषण अपघात; दोन वेगवेगळ्या घटनेत 14 ठार, 15 जण गंभीर जखमी)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तेथील लोकांनी कमाल करुन दाखवली. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे महाभ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी याठिकाणी देखील सत्ता परिवर्तन होणे आवश्यक आहे. मुघलांनी जितकी लूट केली नाही, तितकी लूट आप सरकारने केली आहे. मुलभूत समस्यांच्या अभावामुळे नागरिकांचा बळी जात आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे 20 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत स्थायिक असलेल्या मराठी लोकांनी भाजपाच्या बाजूने कौल द्यावा, असे सचदेवा (Virendra Sachdeva) यांनी सांगितले. महाराष्ट्र हे माझे पहिले प्रेम आहे. कला क्षेत्रात काम करण्यासाठी काही काळ आपण मुंबईत स्थायिक झालो होतो. मुंबई शहराने आपणास मेहनत करण्यासाठी शिकवले. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ हे आपले आवडते खाद्यपदार्थ आहेत, असेही सचदेवा यांनी नमूद केले.

(हेही वाचा – Municipalities Election 2025 : महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर ?)

‘एक है तो सेफ है…’चा प्रत्यय महाराष्ट्रातील लोकांनी आणून दिला. तसा प्रत्यय दिल्लीकरांनी, येथील मराठी लोकांनी आणून द्यावा आणि भाजपाला विजयी करावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चूघ यांनी यावेळी केले. माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचेही यावेळी भाषण झाले. देशातील अनेक राज्यांत भाजपाचे डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी याठिकाणी डबल इंजिन सरकार सत्तेत येणे आवश्यक आहे, असे कराड म्हणाले. ‘नाफेड’ चे संचालक अशोक ठाकूर, नितीन सरदारे, वैभव डांगे, महेंद्र लड्डा यावेळी उपस्थित होते. (Virendra Sachdeva)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.