Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली

Loksabha Election 2024 : "मी दिलेला उमेदवार निवडणूनच आणतो. अजित पवार जेव्हा चॅलेंज देतो, तेव्हा जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल" असं अजित पवार व्हिडिओत दिसत आहेत.

421
Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली
Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली

शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) विजयी झाले आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील उभे होते. अमोल कोल्हेंनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. कोल्हे 1 लाख 54 हजार मतांनी विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अजित पवार यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता जिंकल्यानंतर कोल्हेंनी अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. याद्वारे त्यांनी यांनी खिल्ली उडवली आहे.

(हेही वाचा – एनडीएच्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचा भ्रष्टाचार मुळासकट उखडून टाकणार; PM Narendra Modi यांची घोषणा)

काय आहे म्हटले आहे व्हिडिओमध्ये ?

“मी दिलेला उमेदवार निवडणूनच आणतो. अजित पवार जेव्हा चॅलेंज देतो, तेव्हा जिंकूनच दाखवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल” असं अजित पवार व्हिडिओत दिसत आहेत.

फडणवीसही एका भाषणात, “ते चांगले कलावंत आहेत, नाटककार आहेत. सिने कलाकार आहेत. पण ते चांगले कलाकारच आहेत. खासदार होऊ शकले नाहीत,” असं म्हणताना दिसत आहेत. याच व्हिडिओमध्ये पुढे शरद पवार, जयंत पवार आणि सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. तसेच आदित्य ठाकरेही या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हेंचं कौतुक करताना दिसत आहेत. याचप्रकारे या व्हिडिओत बाळासाहेब थोरात यांनीही अमोल कोल्हेंचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ ट्वीट करून कोल्हे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे.

“आव्हान सोपं नव्हतं… दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ… हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं,” असे या व्हिडिओखाली म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.