महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार (२६ जून) रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ७.०० ते सायं ६.०० ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली. (Vidhan Parishad Election 2024)
भारत निवडणूक आयोगाने दिनांक २४ मे २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार (२६ जून) रोजी सकाळी ८.०० ते सायं ४.०० अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु आता भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०३ जून, २०२४ रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम ५६ नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे. मतदानाची नवीन वेळ बुधवार, दि. २६ जून २०२४ रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी ७.०० ते सायं ६.०० ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात पहिला विजय जाहीर! मुंबई उत्तरमध्ये भाजपाचे पियूष गोयल विजयी)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक २६ जून, २०२४ रोजी पदवीधर व शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे. (Vidhan Parishad Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community