Vidhan Parishad Election 2024 : मनसे महायुतीसोबत नाही? विधान परिषदेबाबत संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट!

116
Vidhan Parishad Election 2024 : मनसे महायुतीसोबत नाही? विधान परिषदेबाबत संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट!
Vidhan Parishad Election 2024 : मनसे महायुतीसोबत नाही? विधान परिषदेबाबत संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच मनसे प्रमुखांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभाही घेतल्या होत्या. मात्र आता त्यांच्यात काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Vidhan Parishad Election 2024)

“राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आदेश दिलेले नाहीत”

विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) मनसे महायुतीबरोबर नाही. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या निवडणुकीबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. देशपांडे म्हणाले, “आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याबाबत आम्हाला आदेश दिलेले नाहीत. आम्ही आमच्या विवेकाने मतदान करू. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा आदेश दिलेला नाही. आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या विवेकाने मतदान करतील.” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Vidhan Parishad Election 2024)

विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर नाही

कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पानसे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महायुतीने ही जागा सोडण्यास नकार दिला. कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून भाजपाचे निरंजन डावखरे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी पुन्हा एकदा भाजपाने डावखरे यांनाच कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. परिणामी पानसे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान, आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसे महायुतीबरोबर नसल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे. (Vidhan Parishad Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.