विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – २५ जून Samvidhaan Hatya Diwas म्हणून घोषित; सरकारने काढली अधिसूचना)
विजयी उमेदवारांची यादी
भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, बोरखे विजयी आणि सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमणे हेही विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव विजयी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार यांना १ जागा गमवावी लागेल, अशी चर्चा चालू होती. असे असूनही राष्ट्रवादीच्या दोन्ही जागा मिळवण्यात अजित पवार यांना यश आले आहे. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव विजयी झाल्या आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेल्या नाहीत.
उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर मतांचा अपेक्षित आकडा गाठू शकलेले नाहीत, तर शेकापचे जयंत पाटील हेही पिछाडीवर आहेत. मिलिंद नार्वेकर यांना २२ मते मिळाली आहेत, तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाली आहेत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community